शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

३ हजार खर्च, पाच लाखांचे उत्पन्न; आयुर्वेदिक चिया बियाच्या शेतीने शेतकऱ्याला केलं मालामाल

By महेश गायकवाड  | Updated: April 10, 2023 17:55 IST

अमेरिका येथील हे मूळ पीक आहे. आयुर्वेदात या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

रांजणी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी शिरीष वझरकर यांनी आयुर्वेदिक चिया बियाणाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. चिया बियाणाची शेतीसाठी केवळ ३ हजारांचा खर्च आला असून, या शेतीतून काढलेल्या उत्पादनातून त्यांना पाच लाखांचे उत्पन्न होणार आहे. शेतकरी शिरीष वझरकर यांनी बदलत्या हवामानात परवडणाऱ्या शेतीच्या केलेल्या या प्रयोगाची तालुक्यात चर्चा होत आहे.  

जालना शहरात नुकत्याच झालेल्या कृषी प्रदर्शनात या पिकाच्या लागवडीची माहिती देण्यासाठी शिरीष वझरकर यांनी स्टाॅल लावला होता. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी चिया बियांची लागवड कशी करायची याची माहिती दिली. कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात ही शेती करता असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा निचरा होणारी हलक्या जमिनीत हे पीक चांगले येते. आपल्याकडील पिकांप्रमाणे या पिकावर फवारणी, खताची गरज भासत नाही. या बियांना प्रतिक्विंटल १ लाख २० हजार रुपये भाव आहे. 

अमेरिकेत होते चिया बियाची लागवडअमेरिका येथील हे मूळ पीक आहे. आयुर्वेदात या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या वजन घटवण्यासह अन्य विविध आजारांवर मात करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. बाजारात चिया बियांची किंमत एक ते दीड हजार रुपये प्रतिकिलो आहे. एका एकरात तीन महिन्यांत सरासरी ४ ते ५ क्विंटल चिया बियाचे उत्पादन होते. त्यातून शेतकऱ्यास जवळपास ४ ते ५ लाख उत्पन्न मिळवता येतात. हवामान बदलाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना ही शेती कमी खर्चात मोठा नफा मिळवून देणारी ठरू शकते. - शिरीष वझरकर, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना