शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेवर २५ गावांतून ५१ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:39 IST

जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे. आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर तालुक्यातील २५ गावातून ५१ जणांनी आक्षेप घेतले असून, त्यावर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीची जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका निवडणूक विभागाने डिसेंबर २०१९ पासून विविध प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.गावचे नकाशे अंतिम करणे, प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे, आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया करणे, प्राथमिक तपासणी व नंतर दुरूस्त्या करणे, विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानंतर तहसीलदारांनी हरकती मागविल्या होत्या. आजवर तालुक्यातील देवमूर्ती येथून सर्वाधिक ८, गोलापांगरी येथून ५, दरेगाव, धानोरा, डांबरी, हिस्वन (बु.), निधोना- अंबेडकरवाडी, सोमनाथ (ज) येथून प्रत्येकी तीन आक्षेप दाखल झाले आहेत.पारेगाव- जैतापूर, भिलपुरी, सेवली येथून प्रत्येकी दोन आक्षेप दाखल झाले आहेत. तर घेटुळी, हिवर्डी, पाचन वडगाव, वानडगाव, मौजपुरी, जामवाडी, बेथलम, लोंढेवाडी, विरेगाव, निरखेडा, हस्तपिंपळगाव, तांदुळवाडी (बु.), उटवद, धांडेगाव येथून प्रत्येकी एक आक्षेप दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपांवर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगTahasildarतहसीलदार