शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

३६५ दिवसांत ४२४ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:40 IST

: गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गत वर्षातील ३६५ दिवसांत जिल्ह्यात ४२४ रस्ता अपघात झाले आहेत. यात १८८ जणांचा बळी गेला असून, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाढलेले अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक नियम जागृती आणि नियम मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडाची कारवाई केवळ जुजबी ठरते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.रस्ता अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, पोलीस ठाण्यातील पथके कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहासह इतर कार्यक्रमांमधून वाहतूक नियमांची जागृतीही प्रशासनाकडून केली जाते. मात्र, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालक वाहने चालवित असल्याने रस्ता अपघाताचे प्रमाण आजही कायम आहे. सन २०१८ मध्ये वर्षभरात ४०० अपघाताची नोंद जालना पोलिसांच्या दप्तरी झाली होती.यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर २७९ जण गंभीर जखमी झाले होते. तर ४३ जण किरकोळ जखमी झाले होते. मात्र, गत वर्षभरात २०१९ मध्ये ४२४ रस्ता अपघाताची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यात १८८ जणांचा बळी गेला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मयतांची संख्या घटली असली तरी गंभीर जखमींची संख्या वाढून ३२९ वर गेली आहे. तर ८७ चालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.रस्ता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ वाहतूक नियम जागृती आणि दंड आकारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांची दुरूस्ती, धोकादायक वळणे, धोकादायक पूल दुरूस्तीसह इतर उपाययोजनांकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे रस्ता अपघातात वाढ होत असून, चालकांनीही स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन केले तरच अपघात रोखण्यास मदत होणार आहे.गतवर्षी २०१९ मध्ये झालेल्या ४२४ अपघातापैकी १७६ अपघातांत १८८ जणांचा बळी गेला आहे. शिवाय ४० अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.२०१८ या वर्षभरात एकूण १९१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात २०५ जणांचा बळी गेला होता. तर ३५ अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याची नोंद आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा