शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भोगगाव शिवारात पंचवीस एकरातील ऊस भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:21 IST

घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले.

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव येथील बारा शेतक-यांचा सुमारे २० एकरातील ऊस शुक्रवारी दुपारी भस्मसात झाला. उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ही आग लागल्याचे शेतक-यांनी सांगितले. तर गोरी-गंगाधरीतही अशाच पद्धतीने चार शेतक-यांचा पाच एकर ऊस खाक झाला. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे या पूर्वीही उसाच्या शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या वर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्याने गोदावरी परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतक-यांनी कर्ज काढून ऊस लागवड केलेली आहे. सध्या अनेक भागात ऊस साखर कारखान्यात नेण्याच्या स्थितीत आहे. मात्र, नोंदणी सुरू न झाल्याने शेतक-यांनी ऊसतोडीला सुरुवात केलेली नाही. शुक्रवारी दुपारी भोगगाव येथील दौलत तुळशीराम गाभूड यांच्या शेतात लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाले. हवेमुळे आगीच्या ठिणग्या शेतात पडल्याने उसाने पेट घेतला. यात गाभूड यांच्या एक हेक्टर २० आर उसाला आग लागली. हवा व उसाच्या वाळलेल्या पाचटामुळे आग आणखी भडली. त्यामुळे या परिसरातील परसराम जिरे, गुलाब जिरे, बालासाहेब जिरे, माणिक गाभूड, गणेश गाभूड, भागवत गाभूड, रवींद्र गाभूड, कैलास वरगे, रामा गाभूड आदींच्या शेतातील सुमारे २० ते २५ एकर उसाचे नुकसान झाले. परिसरातील शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढल्याने शेतक-यांचा नाईलाज झाला. सध्या उसाला एकरी ७० टनांचा उतारा येत आहे. जळीत उसाला कारखान्याकडून कमी दर मिळतो. त्यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सागर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी राधाकृष्ण काळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी शेतक-यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी संताप व्यक्त केला.-------विद्युत विभगाच्या दुर्लक्षामुळे घटनावीज वितरण कंपनीला परिसरातील शेतक-यांनी वारंवार तक्रारी करून, निवेदने देऊन लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने दुर्लक्ष केले. तसेच कारखान्यांनी वेळेवर ऊस नेला असता, तर नुकसान टळले असते, असे शेतकरी काळूजी गाभूड यांनी सांगितले.------------वाढलेल्या उसाचा तारांना स्पर्शतीर्थपुरी येथील विद्युत विभागाचे शाखा अभियंता व्यंकटेश परसे म्हणाले की, या भागातून गेलेल्या एलटीच्या विद्युत तारा १९७२ पासून आहेत. उसाची वाढ झाल्याने हवेमुळे उसाचा विद्युत तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होते. यापूर्वीही रामसगाव, मुरमा, भोगगाव येथे असा प्रकार घडला होता.------------जळालेला ऊस शंभर रुपये टनसागर सहकारी साखर कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक आर.ए. चव्हाण यांनी सांगितले की, जळालेल्या उसाची शनिवारपासून तोडणी करण्यात येईल. या उसाला प्रतिटन १०० रुपये दर दिला जाईल. जळीत ऊस लगेच काढून कारखान्यात आणल्यास वजनात घट येणार नाही.-------------गोरी-गंधारीतही उसाला आगशहागड : गोरी-गंधारी शिवारात शॉर्टसर्किटने ऊस जळाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोरी-गंधारी शिवारातील कित्येक दिवसांपासून महावितरणकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सर्वत्र तारा लोंबकळलेल्या आहेत.गोरी-गंधारी शिवारातील गट क्रमांक १८ मधील बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांच्या शेतातून विद्युत तार गेलेली आहे. देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने तारा लोंबकळलेल्या आहेत. शुक्रवारी अचानक वारा आल्याने तारांची स्पार्किंग होऊन शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे बाबू पटेल व भाऊसाहेब जोगदंड यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळाला, तर बाजूच्या शेतातील शहादेव खरात, अप्पासाहेब खरात, अशोक खरात या तीन शेतक-यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. शेतकºयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. अग्निशमन बंब उशिरा पोहोचला. एका बंबमधील पाणी संपल्यानंतर तो परत न आल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.