जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. आजवर जिल्ह्यातील २९९ डॉक्टर व २१४६ कर्मचारी अशा एकूण २४४५ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही लसीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोरोनाच्या लढ्यातील लसीकरण मोहिमेस १६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला होता. जिल्ह्यातील जवळपास साडेबारा हजारांवर आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली आहे. त्यात आजवर २९९ डॉक्टर, २१४६ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०४ डॉक्टर, ४२६ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अंबड उपजिल्हा रुग्णालयात ५० डॉक्टर, ४६४ कर्मचारी, भोकरदन ग्रामीण रुग्णालयात ३२ डॉक्टर १३९ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयात ६३ डॉक्टर, ४४२ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. राजूर ग्रामीण रुग्णालयात ३ डॉक्टर, २६७ कर्मचाऱ्यांना तर जाफराबाद रुग्णालयात ९ डॉक्टर ६९ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. मंठा येथे १८ डॉक्टर, ७४ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ डॉक्टर व ८० कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. पिंपळगाव (रे.) येथे ९९ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. दीपक रुग्णालयात १२ डॉक्टर ८६ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
मंठ्यात लसीकरणास प्रारंभ
मंठा : येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी लसीकरणास प्रारंभ झाला. प्रथम टप्प्यात ८५० शासकीय, निमशासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.पहिल्या दिवशी ९२ जणांनी लस घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोने यांनी दिली. नोंदणीकृत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डॉ. राजेंद्र गायके यांनी केले आहे.
(फोटो मंठ्याचा आहे)