शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

२४ जणांनी घेतले ७६ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:32 IST

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात गुरूवारपासून लोकसभेची अधिसूचना जारी झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २४ जणांनी ७६ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. २४ अर्ज नेले असले तरी, पहिल्या दिवशी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचेही ते म्हणाले.जालना लोकसभा मतदार संघात निवडणुकीशी संबंधित सर्व ती कामे अंतिम टप्प्यात आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून दोन वरिष्ठ अधिकारी येत असून, पवनकुमार हे जालन्यात दाखल झाल्याचे ते म्हणाले. दुसरे निवडणूक निरीक्षक हे ३ एप्रिलला येणार आहेत. निवडणुका पारदर्शकपणे आणि शांततेत व्हाव्यात म्हणून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. मतदानासाठी दिव्यांगांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेस गुरूपासून प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून, अर्ज माघे घेण्याची अंतिम तारीख ही ८ एप्रिल ही आहे.२३ एप्रिलला मतदान होणार असून, २३ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड प्रॉडक्ट या कंपनीत होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र अ‍ॅपची व्यवस्था केली असून, त्या सीव्हीजी अ‍ॅपवर तक्रार केल्यास १०० मिनिटांत त्याची दखल घेता येणार आहे. आतापर्यंत अ‍ॅपवर दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यांची सोडवणूक करण्यात आल्याचे बिनवडे म्हणाले. पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांची उपस्थिती होती.निवडणुकीवर करडी नजरनिवडणुका शांततेत व्हाव्यात म्हणून एक सीआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली असून, वॉरंट जारी झालेल्यांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येत आहे. ६२ गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींना अटक केली आहे. अवैध दारूवर बंधनासाठी जवळपास आचारसंहिता लागल्यावर १७६ दारू अड्ड्यांवर छापे टाकून दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. ज्याची किंमत १३ लाख रूपये होते. यासह तीन आरोपींवर एमीएडीए काद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. आतापर्यंत जवळपास २४ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. तर आणखी ३९ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले असून, चार ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत . तसेच भरारी पथकांची स्थापना केली आहे.- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना