शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

२० उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:13 IST

जालना लोकसभा मतदार संघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत ९ राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षासह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

जालना : जालना लोकसभा मतदार संघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत ९ राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षासह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी या सर्व उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या तीन मतदार संघांचा समावेश होतो. जालना शहरात ३ लाख २० हजार ४७२ मतदार आहेत. असे असले तरी येथे मंगळवारी झालेल्या मतदानाच्या वेळी टक्केवारी इतर विधानसभेच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. या मागील कारणे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कडक ऊन आणि मतदारांचा निरूत्साह हे देखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.शहरात अनेक भागांमध्ये पोलचिट मिळाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.या उमेदवारांचे भविष्य सीलबंदरावसाहेब दानवे, विलास औताडे, महेंद्र सोनवणे, डॉ. शरदचंद्र वानखेडे, उत्तम राठोड, गणेश चांदोडे, अ‍ॅड. त्रिंबक जाधव, प्रमोद खरात, फेरोज अली, अण्णासाहेब उगले, अनिता खंदाडे, अरुण चव्हाण, अहेमद शेख, ज्ञानेश्वर नाडे, अ‍ॅड. योगेश गुल्लापेल्ली, रत्न लाडंगे, राजू गवळी, शहादेव पालवे, लीलाबाई सपकाळ आणि शाम सिरसाट यांचा समावेश आहे.अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर बाळासाहेब धोंडीराम उबाळे (३५) या युवकाने ईव्हीएमचा फोटो मोबाईलमध्ये काढल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना लोकसभा मतदार संघात वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे ३१ मतदान यंत्र (ईव्हीएम) बदलल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नंदकर यांनी सांगितले. यात जालना विधानसभा ५, भोकरदन ३, पैठण ८, बदनापूर ५, सिल्लोड ३ आणि फुलंब्री विधानसभा मतदार संघातील ७ ईव्हीएम बदलण्यात आले.दरम्यान, राखीव ईव्हीएम ४८८ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ऐन वेळेवर कुठलीच अडचण आली नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, बदनापूर मतदार संघातील काजळा येथे ईव्हीएम वेळेत सुरू न झाल्याने मतदारांना दीड तास वाट पहावी लागली. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाVotingमतदान