लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विजया दशमीनिमित्त येथील दशहरा महोत्सव समितीतर्फे ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेईएस. महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.रावण दहनाचा डोळे दिपवणारा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हिंगोली येथील कोंडीराम भुसाने व त्यांचे सहकारी रावणाची ५१ फुटी प्रतिमा तयार करतात. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश टोपे, संजय लाखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
५१ फुटी रावणाचे आज दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:50 IST