शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

साडेतीन लाखांच्या ३३ मोबाईलसह दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:22 IST

स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष मोहीम राबवत दोन मोबाईल चोर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष मोहीम राबवत दोन मोबाईल चोर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सागर बबन ढाकणे (२१), अतिष रंजीत आडसूळ (१९) (दोघे रा. संभाजी नगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, जालना बसस्थानका जवळ एक इसम नवीन मोबाईल घेऊन जात असताना त्यास सागर ढाकने व अतिश आडसूळ यांनी मारहाण करुन हिसकावून नेला. या माहितीवरुन त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्ह््याची कबुली दिली. त्यानंतर त्यांची पुन्हा कसून चौकशी केली असता, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वेस्थानक, आठवडी बाजार, मंदिरे यासह आदी ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेत एकूण ३३ कंपनीचे स्मार्ट फोन चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार ४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी शेख रज्जाक, कमलाकर अंभोरे, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे, प्रशांत देशमुख, विनोद डदे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, संदीप मांटे, विलास चेके, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, रवि जाधव यांनी केली.विशेष कृती दलाने केले सात मोबाईल जप्तजालना : विशेष कृती दलाने गुरुवारी एका इसमाकडून ४२ हजार ५०० रुपयांचे मोबाईल सात मोबाईल जप्त केले. बालाजी सीताराम चव्हाण (रा. कुदळा, जि. हिंगोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, एमआयडीसी परिसरात सप्तश्रुंगी कंपनीसमोर एक इसम हा चोरीचे सहा ते सात मोबाईल घेऊन विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहे. या माहितीवरून विशेष कृती दलाच्या पथकाने बालाजी चव्हाणला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले.त्याच्याकडून ४२ हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चेतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, नंदकिशोर कामे, किरण चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक