शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात १६ दुकाने फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:34 IST

तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

ठळक मुद्देआरोपींकडून पाऊण लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना : लॉकडाऊनच्या काळात शहरातील १६ दुकाने फोडणाºया टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली असून, संबंधितांकडून ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मागील काही दिवसांपासून शहरातील मोंढ्यामधील दुकाने फोडण्याचे सत्र सुरू होते. या चोरी प्रकरणात हात असलेल्या आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली होती. या माहितीवरून बुधवारी रात्री कैकाडी मोहल्ला व जवाहरबाग परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सचिन बाबू गायकवाड, राम सखाराम निकाळजे व एका अल्पवयीन चोरट्यास जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्या चोरट्यांनी १६ दुकाने फोडल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ६ गुन्ह्यातील चोरलेले कपडे, एलईडी टीव्ही, तीन मोबाईल, ड्राय फूडस्, रोख रक्कम पाच हजार, हेडफोन, हार्डडिस्क आदी ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रंजित वैराळ, विलास चेके, हिरामण फलटणकर, रवि जाधव, पूनम भट्ट, सुरज साठे, पैठणे यांच्या पथकाने केली.

या दुकानात केली चोरीया चोरट्यांनी १८ एप्रिल रोजी दवा मार्केटमधील वरद ड्रेसेस, मराठवाडा कृषी केंद्र, श्रीनिवास एजन्सी, राज एजन्सी आयुर्वेदिक होलसेल, सत्यनारायण ट्रेडर्स, जुना मोंढा, ऋषी किराणा, प्रवीण शर्मा यांचे दुकान फोडले. तर १९ एप्रिल रोजी फुले मार्केटमधील साई मोबाईल शॉपी, माऊली किराणा, गजानन किराणा अशी तीन दुकाने फोडली. २४ एप्रिल रोजी भोकरदन नाका ते नवीन मोंढा येथील साईराम डेली निडस्, प्रतिक अ‍ॅग्रो एजन्सी, पानटपरी अशी तीन दुकाने फोडली. २८ एप्रिल रोजी जुना मोेंढा येथील सतिश ट्रेडर्स, टेक्नोशॉप सोल्यूशन, पराग शेतकरी गोडाऊन अशी तीन दुकाने फोडली. तसेच २८ एप्रिल रोजी जुना मोंढा येथील एका वॉचमनला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईलही चोरट्यांनी चोरून नेला होता.

यापूर्वीही जप्त केला सहा लाखाचा मालस्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या आरोपींना गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चोºया, घरफोड्या, चैन स्नॅचिंग आदी विविध गुन्ह्यात जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ५ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालनाPoliceपोलिसArrestअटक