शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

जालना जिल्ह्यात १५ लाख किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 13:35 IST

Crime in Jalana : महसूल विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

ठळक मुद्दे या प्रकरणी आरोपी फरार झाले आहेत 

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन- सिल्लोड रोडवरील इब्राहिमपूर शिवारात महसूल विभाग व पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाड टाकत बेकायदेशिर विक्री होत असलेले १५ हजार लिटर बायोडिझेल ( biodiesel seized ) जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत (crime in Jalana )  सुरू होती.

भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररीत्या बायोडिझेलची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना मिळाली. याआधारे नायब तहसीलदार बालाजी पपुलवाड, पोलीस कर्मचारी समाधान जगताप यांनी इब्राहिमपूर शिवारातील मुठाड पाटीजवळील एका ढाब्याच्या पाठीमागे छापा मारला. यावेळी १५ लाख रुपये किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले.

आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महसूल विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले. ही कारवाई नायब तहसीलदार संदीप लाड, तलाठी कल्याण माने, तलाठी गणेश वाघमारे, चालक समाधान जगताप, पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी तेलंगरे, कर्मचारी बालाजी पप्पूलवाड यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना