शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बस घुसली घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:07 IST

औरंगाबादहून अकोल्याकडे जाणारी भरधाव बस समोरून येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने घरात घुसली. जालना तालुक्यातील जामवाडीजवळील श्रीकृष्णनगर येथे ही घटना मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना, जामवाडी : औरंगाबादहून अकोल्याकडे जाणारी भरधाव बस समोरून येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने घरात घुसली. जालना तालुक्यातील जामवाडीजवळील श्रीकृष्णनगर येथे ही घटना मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका जालना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.औरंगाबादहून अकोल्याकडे ९६ प्रवासी घेऊन बस जालन्याहून रात्री अकरा वाजेच्या सुमारास निघाली. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव येथे जाणा-या भाविकांची संख्या बसमध्ये अधिक होती. तालुक्यातील जामवाडी परिसरातील श्रीकृष्णनगर येथे समोरुन आलेल्या ट्रकने हुलकावणी दिल्याने बसचालक संदीप दंदी यांनी प्रसंगावधान राखले. याच वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाळू भीमराव इंगळे यांच्या घरात भरधाव बस घुसली. या घटनेत इंगळे यांच्या मालकीची रिक्षा आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.विशेष म्हणजे इंगळे यांनी काही दिवसांपूर्वीच रिक्षा नवीन खरेदी केली होती. यात रिक्षाचे अधिक नुकसान झाले. तर बसमधील १४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णलयात उपचार सुरु आहेत.निर्मला जाधव (चिखली), जया भंडारे (चिखली), अजय पवार (अकोला), शेख उमान शेख लुकाम (खामगाव), नंदा नीलेश इंगोले (औरंगाबाद), अन्सार शहा (राजापूर), गणेश टेकाडे (अमरावती), वैशाली डोंगरे (बुलडाणा), देवचंद जैन (चाळीसगाव), सलीम खान नूर खान (चिखली), तमिजा बी शेख रशीद (चिखली) आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.ग्रामस्थ आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल केले. बसचालकाच्या बाजूला बसलेले गणेश टेकाडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसचालक संदीप दंदी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.