शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१०८ जणांचा डेंग्यू तापाचा पॉझिटिव्ह अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:58 IST

जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे यावर्षी जिल्हाभरातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात डेंग्यू तापाचा तब्बल १०८ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आढळून आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे यावर्षी जिल्हाभरातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात डेंग्यू तापाचा तब्बल १०८ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आढळून आला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी घरच्या परिसरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाभरात नियमित मलेरिया, डेंगु व हिवताप संशयित रूग्णांची तपासणी केली जाते. यात यंदा ४२३ डेंगु सदृश्य नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्याचे रक्ताचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात वर्षभरात तब्बल १०८ जणांना डेंगीचा ताप असल्याचे समोर आले. तसेच १ लाख २२ हजार संशयित हिवताप रूग्णांची तपासणी करण्यात आली असता यात १ रूग्ण हिवतापीचा आढळून आला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलीे.हिवताप व डेंगी तापाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी आठवड्यातून दोन वेळेस घरातील पाण्याचे रांजण, हौद, टाक्या रिकामे करून कपड्याने पुसून कोरडे करून मगच पाणी भरावे. सांड- पाण्याच्या नाल्या वाहत्या करून घेणे व शोष खड्डे तयार करून त्यातच सांडपाणी सोडणे. जुने टायर, डब्बे, नारळाच्या करवंट्या, तुळशीपात्र, कुलर इ. मध्ये पाणी साठू नये, किंवा यांची तात्काळ विल्हेवाट लावावी.रुग्णालयाशी संपर्क साधातुंबलेली गटारे किंवा नाले यावर रॉकेल टाकावे, तसेच तापाचा रूग्ण आढळून आल्यास तात्काळ आरोग्य कर्मचारी किंवा शासकीय रूग्णालयात संपर्क साधून रोगनिदान करून उपचार घ्यावा, असेही आवाहन जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक विजय सिंह शिंदे व महेंद्र वाघमारे यांनी केले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य