शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:30 IST

जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघाविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुना जालना शहरातील एका घरात अवैधरित्या विक्रीसाठी गांजाचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर भागातील भारत रतन पवार याच्या घरावर शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी तहसीलदार श्रीकांत भूजबळ यांच्यासह पंचही उपस्थित होते. या घरामध्ये तब्बल ३५ लाख ३८ हजार रूपये किंमतीचा ७१ किलो गांजा आढळून आला. यावेळी भारत रतन पवार (३० रा. संजय नगर, जुना जालना), दीपक भिमराव हिवाळे (२३ रा. गोलापांगरी ता. जालना) व एक महिला आढळून आली. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द कदीम ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार राजमाने, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पोना प्रशांत देशमुख, रंजित वैराळे, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, पोकॉ सचिन चौधरी, महिला पोना मंदा बनसोडे, चालक पोकॉ धम्मदिप सुरडकर आदींच्या पथकाने केली.इतर साहित्यही जप्तगांजा मोजून पॅकिंग करण्यासाठी असलेला लोखंडी तराजू, माप, वजन, गांजा भरण्यासाठी लागणा-या प्लॅस्टिक पिशव्याही या कारवाईवेळी जप्त करण्यात आल्या आहेत.संबंधितांनी साठा केलेल्या गांजाची प्लॅस्टिक पन्नीमध्ये अर्धा किलो प्रमाणे पॅकिंग सुरू होती. अर्धा किलो वजनाचे हे पॉकेट अवैधरीत्या बाजारात विक्री करण्यासाठी संबंधितांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव उधळला.स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेला ७१ किलो गांजा कदीम पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षाकडे देण्यात आला आहे. कदीम पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला असून, गांजा कोठून आणण्यात आला? याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १० वाजण्याच्या सुमारास भारत पवार याच्या घरावर धाड मारली. घटनास्थळी आढळून आलेला गांजा व इतर साहित्य ताब्यात घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल चार तास तळ ठोकून होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस