शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

झूमबॉबिंग! झूम युजर्सचे 5 लाख अकाउण्ट्स हॅक, झूम वापराविषयी जगभर संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:55 IST

सायबरल सिक्युरिटी फर्मने हे झूम अकाऊण्ट स्वत: विकत घेतल्याने हा उलगडा झाला.

ठळक मुद्देतरीही हे अॅप  तुम्ही वापरणारच असाल तर त्याचं सेटिंग ‘होस्ट ओन्ली’ असं ठेवा

लॉकडाउन सुरु झालं आणि वर्क फ्रॉम होम करणारेच नाही तर सगळेच एकमेकांना भेटण्या-बोलण्यासाठी आतूर झाले.त्यावर उपाय आला कॉन्फरन्स व्हिडीओ कॉल. कुणी गुगल डयुओ डाउनलोड केलं तर कुणी झूम.एकाएकी सगळेच लांबलचक झूमकॉल करू लागले. कामाचे-बिनकामाचे सगळे कॉल झूम होऊ लागले.मात्र त्यात आता अचानक एक धक्कादायक बातमी आली की झूम चिनी हॅक करतात, काहीजण म्हणाले की हॅक करुन आपलं झूम अकाउण्ट आणि व्यक्तिगत माहिती हॅकर्स फोरमवर कवडीमोल भावात विकली जाते.काही मोफत योजनांवर अकाऊण्ट फुकटही दिले जातात.इतके दिवस या अफवा असतील असंही काहींना वाटलं, सायबर स्पेसमधलं अॅपवार असेल अशीही शंका होतीच.मात्र अलिकडेच हे सिद्ध झालं की त्या वावडय़ा नव्हत्या. सायबर सिक्युरिटी इंटिलिजन्स फर्म-सायबल यांनी हॅकर कम्युनिटीच्या फोरमवर जाऊन 1 एप्रिलला स्वत: 5 लाख 3क् हजार झूम अकाऊण्ट विकत घेतली, ती त्यांना अगदी कवडीमोल भावात मिळाली, काहीतर फुकट मिळाली. त्यात बॅँकेत काम करणारे लोक, शैक्षणिक संस्था, क्लासरुम, यासह अनेकांचे अकाऊण्ट आढळून आले.आजच्या घडीला झूमवर 200कोटी युजर्स अकाऊण्ट आहेत आणि रोज ते वाढत आहेत त्यामुळे तिथं सिक्युरीटी ब्रिच, डाटा प्रायव्हसी, युजर्स प्रायव्हसी यांचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.हे अकाऊण्ट टेक्स्ट शेअरिंगसारखे शेअर होतात. युजरचे इमेल आयडी आणि पासवर्ड कॉम्बिनेशन पुरवले जातात. ते वापरुन जर त्या युजरचं अकाउण्ट वापरता आलं तर अशा हॅक अकाउण्टची किंमत वाढते. ते हॅकर्सला विकले जातात. त्यात मग त्या युजरचा इमेल पत्ता, पासवर्ड, पर्सनल मिटिंग युआरएल आणि त्यांची होस्ट की हे सारं विकलं जातं.या सायबरल सिक्युरिटी फर्मने हे झूम अकाऊण्ट स्वत: विकत घेतल्याने हा उलगडा झाला.त्यानंतर न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल यांनी कॅलिफोर्नियास्थित सायबर सिक्युरिटी संस्थांना पत्रं लिहिली की यावर उत्तरं शोधा. काळजी व्यक्त केली की, युजर्सच्या प्रायव्हसीचं काय?इलॉन मस्क या धडाडीच्या उद्योजकाने तर त्याच्या रॉकेट कंपनीत काम करणा:या कर्मचा:यांना बजावले आहे की, कार्यालयीन कामासाठी झूम वापरायचं नाही. स्पेस एक्स ही त्याची रॅकेट कंपनी आहे, आणि त्याविषयी कोणतीच चर्चा झूमवर नको असं त्यानं बजावलं आहे, बंदीच घातली आहे वापराला. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका सव्र्हेनुसार आता दिवसाकाठी झूमवर 2क् कोटी रोज फोन कॉल्स होतात.आणि म्हणून आता हे व्हीडीओ कॉल्स ऑनलाइन हॅकर्सचं नवं लक्ष्य आहे. त्यात अनेक युजर्स नवे आहेत, त्यांना सुरक्षिततेचे नियम माहिती नाहीत.म्हणून आता हॅकर्स अगदी सहज मिटिंगमध्ये घुसतात, अश्लिल फोटो, साहित्य, व्हिडीओ टाकतात. शैक्षणिक संस्थाच्या कॉलमध्ये वाट्टेल ती माहिती नेऊन आदळतात. युजर्सना पोर्न साइट्स, फोटो, माहिती येऊ लागते मेलवर.यासा:याला आता नवीन शब्द आहे. झूमबॉबिंग.

आपण कसे ‘झूमबॉँब’ झालो म्हणजे चालू फोनमध्ये कसं भसकन कुणीतरी घुसलं, माहिती टाकली याचे ट्विट लोक करु लागले आहेत. अमेरिकेत तर एफबीआयने लोकांना बजावलं आहे की गरज नसेल तर हे अॅप वापरू नका. त्याची सिक्युरिटी, मेसेजही एण्ड टू एण्ड इन्क्रिपटेड नाही, म्हणजे तो संवाद दुसरा कुणी ही वाचू, पाहू शकतो.तरीही हे अॅप  तुम्ही वापरणारच असाल तर त्याचं सेटिंग ‘होस्ट ओन्ली’ असं ठेवा असंही आता सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगत आहेत.