शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रशियात घुसून हल्ले करू, झेलेन्स्की यांनी केला निर्धार; हवाई तळांवर हल्ल्यांसाठी मागितली अमेरिकेकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:59 IST

Russia Ukrain War: रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे. राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, ‘जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही.

किव्ह - रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे. राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, ‘जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही. यासाठी मित्रराष्ट्रांचे मन वळवण्यासाठी रोज चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या रक्षणासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पुरवठ्यासह त्याच्या वापराची परवानगी सध्या आवश्यक आहे.’ 

झेलेन्स्की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांची भेट घेणार असून या दौऱ्यात ते युक्रेनच्या विजयासाठी ठरवलेली आपली योजना त्यांच्यासमोर मांडतील. अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात ६ ऑगस्टला युक्रेनने प्रथमच रशियात घुसून कुर्स्कवर ताबा मिळविला होता. तेव्हापासून युक्रेन वरचढ ठरत आहे. 

युक्रेनकडून आजवरचा सर्वात मोठा हल्ला- युक्रेनने शनिवारी रात्री मास्कोवर ड्रोनने आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला.- हा हल्ला आपल्या हवाईदलाने परतावून लावत १५८हून अधिक ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी केला. - कुर्स्क भागात ४६ ड्रोन नष्ट करण्यात आले. ब्रायन्स्क भागात ३४ तर वोरोनेझ भागात २८ ड्रोन नष्ट करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया