शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुझा झगा गं वा-यावरती उडतो, मेट गाला 2017मध्ये प्रियंका चोप्राचीच चर्चा

By admin | Updated: May 2, 2017 16:12 IST

सेक्सी अवतारामुळे प्रियंका चोप्रानं हॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. तिच्या या भन्नाट लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राला आंतरराष्ट्रीय सोहळ्यात आपल्या लुक्सनं लोकांवर कशी मोहिनी घालायची व हॉलिवूडकरांमध्येही स्वतःची वेगळी छाप कशी पाडायची?, हे चांगलंच माहिती आहे. मग ऑस्कर अॅवॉर्ड असो किंवा गोल्डन ग्लोब्स... प्रियंका आपल्या ड्रेस, मेकअप आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. 
 
नुकतीच प्रियंका "मेट गाला 2017"मध्ये सहभागी झाली होती. नेहमी प्रमाणे या वेळेसही तिनं हॉलिवूड कलाकारांमध्ये स्वतःची छाप जरा हटके पद्धतीने पाडली. सेक्सी आणि हॉट लुकनं प्रियंकानं उपस्थितांना घायाळ केलं.  अमेरिकेतील टीव्ही मालिका क्वांटिकोमध्ये आपल्या अभिनयाने लोकांना घायाळ करणा-या प्रियंकानं कॉलर कोट परिधान केला होता.   
 
या सोहळ्यात प्रियंकाने रेड कार्पेटवर  ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट  खाकी रंगातील गाउन परिधान केला होता. या गाउनसोबत तिनं काळ्या रंगाचे बुटही घातले होते. डोळ्यांवर केलेला स्मोकी मेकअपमुळे ती आणखीनच मादक दिसत आहे. विशेष म्हणजे
प्रियांकाने घातलेला हा गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाउन असल्याचे बोलले जात आहे.
 
आपल्या या सेक्सी अवतारामुळे प्रियंकानं तर हॉलिवूडमधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. तिच्या या भन्नाट लुकची आंतरराष्ट्रीय मीडियानं खूप वाहवाई केली आहे.  प्रियंका चोप्राचे या सोहळ्याला हजेरी लावणं यासाठीही विशेष मानले जाते कारण हॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी यात सहभागी होतात.  
 
दरम्यान, ही देसी गर्ल लवकरच हॉलिवूडमधील सिनेमा बेवॉचमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा भारतात 26 मे रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.