शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचंय," शहबाज यांचं नवाज शरीफ यांना परतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 09:29 IST

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीसोबतच राजकीय संकटही आता गडद होत आहे.

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीसोबतच राजकीय संकटही आता गडद होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचेपंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) सुप्रीमो नवाझ शरीफ यांना परतण्याची विनंती केली आहे. नवाझ शरीफ यांनी पुन्हा यावं आणि देशातील निवडणूक प्रचाराचं नेतृत्व करावं असं म्हणत त्यांनी नवाझ शरीफ यांना चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचं आवाहनही केलंय.

जिओ न्यूजनुसार, नवाझ शरीफ हे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये राहत आहेत. पीएमएल-एन पक्षाच्या सेंट्रल जनरल कौन्सिलच्या बैठकीला शहबाझ शरीफ यांनी संबोधित केलं. तसंच आपण नवाझ शरीफ यांची वाट पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय त्यांनी पाकिस्तानात परतावं आणि चौथ्यांदा पंतप्रधान बनावं असं आवाहनही त्यांनी केलंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पक्षाची बैठक घेण्यामागचं कारण निवडणूक आयोगाला सांगितलं. आमच्यावर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. पीएमएल-एनला तरुण नेतृत्वाची गरज असल्याचं त्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं. याशिवाय नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांचंही या बैठकीत कौतुक करण्यात आलं. नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यानंतर राजकारणाची दिशाच बदलेल असंही शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट केलं.

गुलाब नाही काटे मिळाले...आपल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरीफ यांनी आपला पक्ष सत्तेत आला तेव्हा आपल्याला गुलाब नाही, तर काटे मिळाले होते असं म्हणत महागाईनं जनतेचं कंबरडं मोडलं होतं, असं ते म्हणाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे पीएमएल-एनचे सुप्रीमो आहेत. ते तीन वेळा पंतप्रधानही राहिले आहेत. पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ यांना २०१७ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं, त्यानंतर त्यांना कोणत्याही पक्षात जाण्यास मनाई करण्यात आली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफprime ministerपंतप्रधान