शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:03 IST

United State News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ‘तू बाहेर चल तुझं तोंडच फोडतो’, अशी धमकी एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधीली एका विशेष क्लब एक्झिक्युटिव्ह ब्रँचचं उदघाटन आणि एक पॉडकास्ट होस्ट चमथ पालिहपितिया यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमावेळी घडली. सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणजेच अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि फेडरल हौसिंग फायनान्स एजन्सीचे डायरेक्टर बिल पुल्टे यांच्यात ही वादावादी झाली.

एक्झिक्युटिव्ह क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीवेळी स्कॉट बेसेन्ट यांनी पुल्टे यांच्या तोंडावर बुक्का मारण्याची धमकी दिली. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिल पुल्टे हे ट्रम्प यांच्यासमोर आपल्या कागाळ्या करतात, अशी कुणकूण बेसेंट यांना लागली होती. त्यामुळे स्कॉट बेसेन्ट यांच्या संताप अनावर झाला. त्यांनी बिल पुल्टे यांच्या तोंडावर ठोसा मारण्याची धमकी दिली.ही घटना ४ सप्टेंबर २०२५ रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका खाजगी डिनर पार्टीदरम्यान, घडली. या डिनर पार्टीसाठी ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी सीन डफी, कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक, इंटीरियर सेक्रेटरी डग बर्गम आणि नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड आदी महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.

दरम्यान, कॉकटेल पार्टीतील गोंधळावेळी बेसेन्ट यांनी पुल्टे यांना शिविगाळ करत टिप्पणी केली. तुम्ही राष्ट्राध्यक्षांना माझ्याबाबत काय सांगत आहात. तुम्ही खड्ड्यात जा. मी तुमच्या तोंडावर ठोसा मारेन, अशी धमकी बेसेन्ट यांनी पुल्टे यांना दिली. बेसेन्ट यांचा तो आवेश पाहून पुल्टे अवाक् झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या तमावपूर्ण वातावरणात क्लबचे सहमालक आणि फायनान्सर ओमीद मलिक यांना मध्ये पडून  हस्तक्षेप करावा लागला. मात्र बेसेन्ट यांना हे अमान्य होते. त्यांना पुल्टे यांना बारमधून बाहेर काढायचे होते. दरम्यान, या घटनेनंतर रविवारी बेसेन्ट हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन ओपनचा अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या आसनापासून दूर बसवण्यात  आले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय