जम्मू-काश्मीरमधील मशिदींच्या प्रोफाईलिंगवरून भारताला शहाणपण शिकवणाऱ्या पाकिस्तानला बलूच नेत्याने चांगलेच सुनावले आहे. "पाकिस्तान हा स्वतःच एक दहशतवादी देश असून त्यांनी बलूचिस्तानमध्ये स्वतः मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत," अशा शब्दांत बलूच नेते मीर यार यांनी शहबाज शरीफ सरकारचा बुरखा फाडला आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर यामुळे मोठी नाचक्की झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनाने मशिदी, त्यांची व्यवस्थापन समिती आणि इमाम यांची माहिती गोळा करण्यासाठी एक प्रोफाईलिंग मोहीम सुरू केली आहे. यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उडी घेत, ही धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली असल्याची टीका केली होती. मात्र, पाकिस्तानचा हा दुतोंडीपणा बलूच नेत्यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे.
पाकिस्तानने स्वतःच पाडल्या ४० मशिदी!
बलूच नेते मीर यार यांनी 'एक्स'वर पाकिस्तानचा काळा इतिहास उघड केला. ते म्हणाले, "पाकिस्तानची सेना धार्मिक आणि जिहादी कट्टरवाद्यांचा वापर करून हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना घाबरवण्यासाठी शस्त्र म्हणून करते. पाकिस्तानने बलूचिस्तानमध्ये सुमारे ४० मशिदी उद्ध्वस्त केल्या आहेत. मशिदींवर थेट बॉम्बफेक करणे, कुराण जाळणे आणि मशिदींच्या प्रमुखांचे अपहरण करणे, असे अमानवीय प्रकार पाकिस्तानी लष्कराने केले आहेत."
कलतच्या मशिदीवर अजूनही हल्ल्याच्या खुणा
मीर यार यांनी आठवण करून दिली की, पाकिस्तानी लष्कराने सर्वात आधी 'खान ऑफ कलत' यांची मशीद लक्ष्य केली होती. पाकिस्तानी रणगाड्यांनी आणि तोफखान्याने नागरिकांवर गोळीबार केला होता. त्या मशिदीवर आजही मॉर्टर शेलच्या खुणा असून, त्या पाकिस्तानच्या क्रूरतेचा आणि बिगर-इस्लामी वर्तनाचा जिवंत पुरावा आहेत.
भारताच्या भूमिकेला पाठिंबा
बलूचिस्तान पूर्णपणे भारताच्या भूमिकेसोबत उभा असल्याचे सांगत मीर यार यांनी स्पष्ट केले की, जो देश स्वतः अल्पसंख्याकांचा छळ करतो, त्याला दुसऱ्यांना मानवाधिकारावर प्रवचन देण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेवर टीका करून पाकिस्तानने पुन्हा एकदा स्वताचे हसे करून घेतले आहे. आता बलूच नेत्याच्या या टीकेनंतर पाकिस्तान सरकार काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Baloch leader Mir Yar exposed Pakistan's hypocrisy, revealing its support for terrorism and destruction of mosques in Balochistan. He criticized Pakistan for commenting on Kashmir while oppressing its minorities.
Web Summary : बलूच नेता मीर यार ने पाकिस्तान के पाखंड को उजागर किया, बलूचिस्तान में आतंकवाद और मस्जिदों के विनाश के समर्थन का खुलासा किया। उन्होंने कश्मीर पर टिप्पणी करने के लिए पाकिस्तान की आलोचना की, जबकि वह अपने अल्पसंख्यकों का उत्पीड़न करता है।