योगासनांचे महत्त्व एव्हाना सर्व जगाने मान्य केले आहे; पण एखादा कुत्रा योगासने करतो असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहून मात्र याबाबतची खात्री पटू शकते. हा कुत्रा या घरातील महिलेची नक्कल करताना दिसत आहे. तो हुबेहूब या महिलेसारखाच योगासने करत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिसते की, या महिलेने योगासने करण्यासाठी मॅट आणली आहे. त्यासोबत हा कुत्रादेखील मॅट आणतो आणि योगासने सुरू होतात. हा कुत्रा महिलेची नक्कल करत सर्व स्टेप करतो. ही महिला डोके वर करते तर कुत्रा देखील मान उंचावतो. अशाच प्रकारे एकानंतर एक असे योगासने करताना या व्हिडिओत दिसत आहे. कुत्र्याचे योगासने सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
हा कुत्रा करतो योगासने
By admin | Updated: May 23, 2017 02:47 IST