शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 19:20 IST

दहशतवादी संघटना JKLF प्रमुख यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक यांनी मुशाल मलिकला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील केले आहे. मुशाल मलिक, काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात भारतीय तुरुंगात कैद असलेल्या यासिन मलिकची पत्नी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्वर उल हक पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान झाले आहेत. 

डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी मुशाल मलिकचा 18 सदस्यीय मंत्रिमंडळात समावेश केला असून, पंतप्रधानांची मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानमध्ये राहणारी यासिन मलिकची पत्नी मुशाल सातत्याने पाकिस्तानच्या नेत्यांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पती निर्दोष असल्याने त्याला वाचवण्याचे आवाहन करत आहे.

मुशाल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये यासिन मलिकसोबत लग्न केले. विकिपीडियानुसार, 2005 मध्ये यासिन पाकिस्तान दौऱ्यावर असताना दोघांची भेट झाली होती. मुशाल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर आहे. मुशाल मलिकची आई, रेहाना हुसैन मलिक, पीएमएल-एन महिला विंगच्या सरचिटणीस होत्या, तर तिचे वडील, एमए हुसैन मलिक, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ आणि बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

यासिन मलिकला जन्मठेपभारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी यासिन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्या कारवायांना 'रेरेस्ट ऑफ द रेअर' मानून फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती. यासिन मलिकला आयपीसी कलम 121(भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये मृत्युदंडाची शिक्षा आहे. टेरर फंडिंग प्रकरणात NIA ने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पण, यासिन मलिकला गेल्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय मलिकला पाच वेगवेगळ्या खटल्यांमध्ये 10-10 वर्षे आणि तीन वेगवेगळ्या प्रकरणात 5-5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारInternationalआंतरराष्ट्रीयterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर