शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जगातले सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:38 IST

जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपविले नव्हते.

जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपविले नव्हते. या बाळाचे जन्माच्या वेळचे वजन हे केवळ २६८ ग्रॅम इतके होते. २४ आठवड्यांपूर्वी आईच्या गर्भाशयात बाळाचा विकास होणे थांबले होते. त्यानंतर, सर्जरी करून बाळाला जन्म देण्यात आला. आता २४ आठवड्यांनी या बाळाला चांगल्या तब्येतीसोबत आई-वडिलांकडे सोपविण्यात आले आहे.आता इतके आहे वजनजेव्हा बाळाचा जन्म झाला, तेव्हा त्याचे वजन फारच कमी होते. त्यामुळे डॉक्टरांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर, डॉक्टरांनी त्याच्यावर वेगवेगळे उपचार केले. आता या बाळाचे वजन ३१७५.१५ ग्रॅम इतके आहे. ही घटना टोकियोच्या कीओ युनिव्हर्सिटी रुग्णालयातील आहे.या बाळाच्या आईने सांगितले की, ‘मला फक्त इतकंच सांगायचेय की, मी फार आनंदी आहे. खरे तर मला अजिबात वाटले नव्हते की, माझे बाळ जिवंत राहील, पण देवाच्या कृपेने तो जिवंत आणि सुदृढ आहे.’या बाळावर उपचार करणारे डॉक्टर ताकेशी अरिमित्सु म्हणाले की, जन्म झाला, तेव्हा ते बाळ फारच लहान आणि कमजोर होते. किओ युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या नावावर आता जगातल्या सर्वात लहान बाळाची डिलिव्हरी करण्याचे आणि त्याला सुदृढ ठेवण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. या आधी जगातले सर्वात लहान बाळ जन्माला येण्याचे रेकॉर्ड जर्मनीत होते. २००९ मध्ये इथे एका मुलाचा जन्म झाला होता, त्याचे वजन केवळ २७४ ग्रॅम इतकेच होते, तर सर्वात छोट्या मुलीचे रेकॉर्डही जर्मनीतच झाले होते. २०१५ मध्ये इथे २५२ ग्रॅम वजनाची मुलगी जन्माला आली होती.