शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

जगाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात; चीन भांडणंही लावतोय : अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:43 IST

‘चीन करून घेतोय आपलं उखळ पांढरं!’

अमेरिका/चीन 

कोरोना व्हायरस या एकाच शत्रूशी संपूर्ण जग मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत असताना, यामुळे काही देश जवळ आल्याचं दिसत असताना याच व्हायरसमुळे काही देशांमधील संबंध अगदी ताणले गेल्याचं आणि एकमेकांना ते खाऊ की गिळू या नजरेनं पाहात असल्याचंही दिसलं आहे. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे चीनअमेरिका. कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत झाला असून, चीनने मुद्दाम हा वाह्यातपणा करून जगाला संकटात आणल्याचा आरोप तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खुलेआम करीत आहेत. ‘चीनला बघून घेऊ,’ अशा धमक्याही त्यांनी दिल्या आहेत.

याच अध्यायाचा पुढचा भाग म्हणजे चीन, रशिया आणि काही प्रमाणात इराण कोरोनाच्या या महामारीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत. याच माध्यमांतून युरोप आणि नाटो यांच्यामध्ये दुफळी माजवून विभागणी करण्याचा प्रयत्नही चीन करीत आहे, असा नवा आरोप आता सुरू झाला आहे.

यासंदर्भात अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी सोमवारी असा दावा केला की, चीननं कोरोनामुळे सगळ्या जगाला संकटाच्या खाईत तर लोटलंच; पण आता चीनच्या बरोबरीनं रशियाही कोरोनाच्या या महामारीचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करण्याचा कृतघ्नपणा करीत आहे. याचाच फायदा घेऊन युरोपात आपले हितसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न या देशांनी चालवला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

युरोपात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला तो इटलीमध्ये; पण त्याचाच फायदा घेण्यासाठी चीन आणि रशियानं लगोलग आपली वैद्यकीय उपकरणं, मास्क यांचा पुरवठा इटली आणि इतर युरोपीय देशांना करून त्या माध्यमातून स्वत:ची चांदी करून घेण्याचा गोरखधंदा चालू केला आहे. एवढ्यावरच चीन थांबलेला नाही. त्यानं या देशांची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा आणि खिळखिळी करण्याचा उपद्व्याप चालवला असल्याचंही अमेरिकेचं म्हणणं आहे. आपल्या मोबाईल व तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून चीन सगळ्या जगावर केवळ पाळत ठेवण्याचाच नाही, तर त्यांची सुरक्षा व्यवस्थाही तकलादू करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला जात आहे.‘हुवेई’ आणि ‘झेडटीई’ या चीनमधल्या अतिबलाढ्य बहुराष्ट्रीय टेलिकॉम कंपन्या. स्मार्टफोन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स फाईव्ह जी नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स तयार करणं व ती जगभर विकणं हे काम या कंपन्या करतात. कोरोनाचा उपयोग करून वेगवेगळ्या देशांत त्यांचं ‘जाळं’ आता ते फैलावत आहेत.

या कंपन्यांच्या माध्यमातून जगाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा कुटिल डाव या महामारीत चीन करीत आहे, असंही एस्पर यांनी म्हटलं आहे. स्वत:चं उखळ पांढरं करून घेणाऱ्या चीनच्या देखाव्याला जगभरातल्या देशांनी अजिबात भुलू नये आणि या कंपन्यांवर तसेच त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही अमेरिकेनं केलं आहे. कोरोनानं जगभरात आपली दहशत निर्माण केलेली असतानाच, काही देशांमधलं वितुष्टही असं वाढवलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन