शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

जगातील सर्वांत महागडा घटस्फोट मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 4:43 AM

३८ अब्ज डॉलरची पोटगी देऊन जेफ बेझोस २५ वर्षांनंतर एकमेकांपासून झाले विभक्त

वॉशिंग्टन : अ‍ॅमेझॉन इन्कॉर्पोरेटेड या आॅनलाइन मार्केटिंगच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे संस्थापक मालक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांच्या सहमतीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोटगी म्ह़णून पतीकडून पत्नीला ३८.३ अब्ज डॉलरची (सुमारे २५ लाख कोटी रुपये) संपत्ती देणारा जगाच्या इतिहासातील आजवरचा हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.

गेली २५ वर्षे पती-पत्नी असलेल्या जेफ व मॅकेन्झी या दाम्पत्याने विभक्त होण्याचा आपला इरादा गेल्या जानेवारीत टिष्ट्वटरवर जाहीर केला होता. या घटस्फोटासाठी दोघांमध्ये झालेल्या समझोत्यावर सिएटल येथील न्यायालयाने शुक्रवारी शिक्कोमोर्तब केले. आकडा वाचूनही सर्वसामान्यांना भोवळ येईल एवढी संपत्ती फारकतीसाठी पत्नीच्या हवाली करूनही जेफ बेझोस यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे अव्वल स्थान व अ‍ॅमेझॉन कंपनीवरील नियंत्रण अबाधित राहील.

अ‍ॅमेझॉन कंपनीचे एकूण १६ टक्के भागभांडवल बेझोस दम्पतीकडे संयुक्तपणे होते. त्यापैकी ३८ अब्ज डॉलर एवढ्या प्रचलित मूल्याचे चार टक्के भागभांडवल घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांच्या एकटीच्या मालकीचे होईल. त्यामुळे त्या जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक श्रीमंत महिला होतील. घटस्फोटानंतरही जेफ यांच्याकडे अ‍ॅमेझॉनचे १२ टक्के भागभांडवल कायम राहील. त्याचे सध्याचे मूल्य ११४.८ अब्ज डॉलर एवढे असेल.

अ‍ॅमेझॉनचे चार टक्के भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांनी जेफ यांच्याच हाती पुन्हा सुपूर्द केले आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहील. (वृत्तसंस्था)

निम्म्या संपत्तीचा दानधर्मअब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट व मायक्रोसॉफ्टच संस्थापक बिल गेट््स यांनी जगभरातील गर्भश्रीमंतांना आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचे आवाहन करून सन २०१० मध्ये एक खुला वचननामा जारी केला होता.मॅकेन्झी बेझोस यांनी या वचननाम्यावर स्वाक्षरी करून आपली निम्मी संपत्ती दान करण्याचे मे महिन्यातच जाहीर केले होते. त्यामुळे घटस्फोटापोटी मिळणाऱ्या ३८ अब्ज डॉलरपैकी निम्म्या संपत्तीचा त्या दानधर्म करतील. जेफ व मॅकेन्झी यांना दोन अपत्ये असून घटस्फोटानंतर त्याच्या पालकत्वासंबंधी उभयतांनी स्वतंत्र समझोता केला आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन