शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जगातील सुंदर महिला ठरलेल्या जेनिफर अॅनिस्टनचा दोन वर्षात मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:43 IST

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअॅनिस्टन 49 तर थेरॉक्स 56 वर्षांचा आहे. 2011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. पती-पत्नीचे नाते संपले असले तरी मैत्रीचे नाते दोघांमध्ये कायम राहिलं असे निवेदनात म्हटले आहे. 

वॉशिंग्टन - हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2017 च्या अखेरीस आम्ही वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही परस्पर सहमतीने आणि विचारपूर्व हा निर्णय घेतल्याचे दोघांनी म्हटले आहे. पती-पत्नीचे नाते संपले असले तरी मैत्रीचे नाते दोघांमध्ये कायम राहिलं असे निवेदनात म्हटले आहे. 

दोघांच्या नात्याबद्दल माध्यमांमध्ये बरीच उलट-सुलट चर्चा सुरु होती. त्यामुळे त्यांनी अधिकृतपणे निवेदन जारी करुन माहिती दिली आहे. अॅनिस्टन 49 तर थेरॉक्स 56 वर्षांचा आहे. 2011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. अॅनिस्टनचा प्रसिद्धीप्रमुख स्टीफ्न ह्युवानेकडून हे निवेदन जारी करण्यात आले. 

आम्ही दोघे परस्परांचे चांगले मित्र असून आमच्यातील ही मैत्री पुढेही कायम राहिलं असे दोघांनी म्हटले आहे. वँडरलस्ट चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. 2012 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेनिफरचा याआधी अभिनेता ब्रॅड पीटबरोबर विवाह झाला होता. पाच वर्षाच्या विवाहानंतर त्यांनी 2005 साली घटस्फोट घेतला. ब्रॅड पीटने नंतर अभिनेत्री अँजलिना जोली बरोबर लग्न केले. दोघांचे प्रेम प्रकरण जगभरात गाजले. पण त्यांचाही घटस्फोट झाला.  

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिलादोन वर्षांपूर्वी पीपल मॅगझिनने २०१६ मधील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली होती. पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ही बातमी समजल्यानंतर आपल्याला अत्यानंद झाला. या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत असे जेनिफरने म्हटले होते.

अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील राचेल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जाडेपणा काम मिळण्यामध्ये आडवा येत असल्याचे एजंटने सांगितले. त्यानंतर मी स्वत:वर मेहनत घेतली असे तिने सांगितले.