शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 14:52 IST

1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.

कोपनहेगन- ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत असले तरी जहाज कंपन्यांना मात्र यातून एक वेगळाच फायदा होण्याची शक्यता आहे. आर्क्टिकवरील नॉर्दर्न सी रूट या कंपन्यांना आता अधिक काळ वापरता येण्याची शक्यता आहे.1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.गेल्या दशकभरात पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे आर्क्टिकजवळील मार्ग दीर्घकाळ खुले राहिले तर वेळेमध्ये बचत होईल असे वाहतूक कंपन्यांना वाटते.

मर्क्स कंपनीने वेंटा मर्क्स हे 3600 कंटेनर भरलेले जहाज या मार्गावर पाठवले आहे. मर्क्सच्या या प्रयत्नामुळे भविष्यात या मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे असे मत आर्क्टिक इन्स्टीट्यूटचे माल्ट हम्पर्ट यांनी व्यक्त केले आहे.जर या मार्गावरुन प्रवास करता आला तर वेळेबरोबर खर्चातही बचत होणार आहे. रशिया आणि नॉर्वेच्या सीमेवरील मर्मंस्क येथून अलास्काच्या खाडीपर्यंत येथून जलमार्ग जातो. त्यासाठी जहाजांना रशियाची परवानगी घ्यावी लागते. पण वेळेत बचत होत असली तरी बर्फ तोडण्यासाठी वेगळा खर्च कंपन्यांना करावा लागतो. बर्फ वितळल्यास या खर्चात घट होऊ शकेल.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2013 पर्यंत आर्क्टीक मधून जाणाऱ्या मार्गावरुन 4 फूट जाड बर्फ तोडून जाणारी जहाजे प्रवास करु शकतील. तर 2045-2060 या कालावधीमध्ये याच वेगाने बर्फ वितळत गेल्यास सामान्य मालवाहू जहाजेही येथून प्रवास करु शकतील.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय