शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

जगातील सर्वांत मोठे हॉटेल मक्केत

By admin | Updated: August 5, 2016 09:45 IST

मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल

रियाध: मुस्लिमांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल.मक्का शहराच्या मध्यवस्तीत मनाफिया भागात पवित्र काबापासून दोन किमी अंतरावर हे हॉटेल उभे असून राहत 10000 निवासी खोल्या असलेले सर्वात मोठे हॉटेल ठरेल.सौदी अरबस्तानच्या वित्त मंत्रालयाने तेथील राजघराण्याचा अत्यंत लाडका आणि महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी ३.५ अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च केला जात आहे. इस्लामच्या मक्का व मदिना या दोन सर्वात पवित्र तीर्थस्थळांचे रखवालदार असे स्वत:ला म्हणवून घेणाऱ्या सौदी सरकारने या हॉटेलचे नावही इस्लामने प्रेरित होऊन ‘अबराज खुदाई’ (परमेश्वरी निवासस्थान) असे निवडले आहे.7351 निवासी खोल्या असलेले मलेशियातील ‘फर्स्ट वर्ल्ड हॉटेल’ हे जगातील सध्या सर्वात मोठे हॉटेल मानले जाते. ‘अबराज खुदाई’मध्ये याहून अडीच हजार निवासी खोल्या जास्त असतील. दार-अल- हांदासाह ग्रुपने या अतिभव्य हॉटेलचे डिझाईन केले आहे.>हॉटेल संकुलातील केंद्रस्थानी असलेला टॉवर सर्वात उंच म्हणजे ४८ मजली असेल व त्यावरील घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट असेल. बाजूला दोन टॉवर उंचीने त्याहून कमी असतील व त्यावरील घुमटांखाली बॉलरूम व कन्व्हेंशन सेंटर असेल. याच्या बाहेर चार टॉवरच्या छतावर चार हेलिपॅड असतील. हॉटेलच्या पोडियमवर बस स्टेश्न, शॉपिंग मॉल, उपाहारगृहे, फूड कोर्ट, कॉन्फरन्स सेंटर आणि वाहनतळ असेल. राजघराण्यातील सदस्यांचे येथे वरचेवर येणे अपेक्षित असल्याने त्यांच्यासाठी संपूर्ण मजले स्वतंत्रपणे आरक्षित करता येतील अशीही व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रचंड आकार, गगनचुंबी उंची, मध्यवर्ती ठिकाण आणि आधुनिक व इस्लामी वास्तुकलेचा मिलाफ साधून केलेले बांधकाम यामुळे हे हॉटेल म्हणजे मक्का शहराचे नवे आकर्षण आणि खास ओळख ठरेल.