शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्र शस्त्रास्त्रांच्या विळख्यात जग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 12:40 IST

भारतासह जगातील ९ प्रमुख देशांकडे आज १३ हजार ४०० च्या आसपास अण्वस्त्रे आहेत. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत.

-निनाद देशमुख, वरिष्ठ उपसंपादकदुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अण्वस्त्रे टाकून ही शहरे बेचीराख करत हे युद्ध संपुष्टात आणले. या घटनेने अण्वस्त्रांची संहारक क्षमता संपूर्ण जगाने अनुभवली. मात्र, असे असतानाही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी आज अनेक देशही झटत आहे. भारतासह जगातील ९ प्रमुख देशांकडे आज १३ हजार ४०० च्या आसपास अण्वस्त्रे आहेत. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार केल्यास अमेरिका आपले जागतिक वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर चीन या प्रतिष्ठेला शह देऊन ते स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर रशियाही आपली पूर्वीची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण जग आण्विक हल्ल्याच्या विळख्यात सापडले आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीप्री) या जागतिक संस्था जगात अस्तित्वात असलेल्या अण्वस्त्रांची माहिती ठेवते. दर वर्षी ही संस्था आपला अहवाल प्रसिद्ध करत असते. याही वर्षी सोमवारी (दि. १४) या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून तो चिंताजनक आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे. असे असतानाही जगातील प्रमुख ९ देशांनी त्यांच्या अण्वस्त्र संख्येत वाढ केली आहे. अमेरिका आणि रशिया या दोन देशांकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. त्या खालोखाल चीन आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि भारताचा क्रमांक लागतो. सीप्रीच्या अहवालानुसार रशियाकडे सर्वाधिक ६ हजार २५५ अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२० अण्वस्त्रात रशियाने कपात केली आहे. तर अमेरिकेकडे ५ हजार ५०० अण्वस्त्रे आहेत. अमेरिकेनेही त्यांच्या शस्त्रागारातील अण्वस्त्रांमध्ये २५० च्या संख्येने कपात केली आहे. मात्र ब्रिटन, पाकिस्तान आणि चीनने त्यांच्या अण्वस्त्र शस्त्रागारात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ केली आहे. ब्रिटनकडे २२५, फ्रान्सकडे २९०, चीनकडे ३५०, पाकिस्तानकडे १६५, भारताकडे १५६, इस्राईलकडे ९० तर उत्तर कोरियाकडे ४० ते ५० अण्वस्त्रे आहेत. चीन आणि पाकिस्तानकडील वाढते अण्वस्त्रे ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. असे असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण भारतानेही ‘सेकंड स्ट्राईक न्यूक्लिअर’क्षमता विकसित केली आहे. अमेरिकेकडे सध्याच्या स्थितीत १ हजार ८०० अण्वस्त्रे ही तयार अवस्थेत आहेत. तर रशियाकडे १ हजार ६२५ तयार अण्वस्त्रे आहेत. कुठल्याही क्षणी ती शत्रूवर डागता येईल अशा अवस्थेत ती आहेत. भारत, चीन, पाकिस्तानकडे अशी किती अण्वस्त्रे आहेत याची माहिती संस्थेला उपलब्ध होऊ शकली नसली, तरी ही संख्याही मोठीच आहे.

कोरोना महामारीचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. अनेकांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अशा अवस्थेतही मोठ्या प्रमाणात प्रगत देशांसह विकसनशील देशांनी आपली लष्करी क्षमता विकसित करण्यावर गेल्या दोन वर्षांत भर दिला आहे. कोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत होते. आता नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही चीनवर लक्ष साधत त्यांच्या गुप्तचर संस्थांना ९० दिवसांत याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापर युद्ध तर आहेच, तसेच दक्षिण चीन समुद्र आणि तैवान प्रश्नावरून सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यात गेल्या वर्षापासून चीनने भारताशी सीमावाद उकरून लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात सैन्य जमवले आहे. दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती आजही आहे. चीनने त्यांची अत्याधुनिक शस्त्रे सीमेवर तैनात केली आहे. भारतानेही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर सैन्यव्यवस्था मजबूत केली आहे. दोन्ही देशांत सध्या चर्चा सुरू असली, तरी तणाव निवळला नाही. दुसरीकडे आखाती देशात इस्राईल-पॅलेस्टाईनवरून संघर्ष सुरू आहे. इराणही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही चीनला लक्ष करण्यात आले. याला चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. रशियातील ब्लादमिर पुतीन यांचे विरोधक असलेले ॲलेक्सी नवेलनी आणि युक्रेन प्रश्नावरून अमेरिका आणि रशिया यांचा तणाव आहे. पुतीन आणि बायडेन यांची जिन्हेवा येथे बैठक झाली. यावर विस्तृत चर्चा झाली असली, तरी प्रत्येक मुद्यावर तोडगा निघाला असे आजही म्हणता येणार नाही. चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, अमेरीका आणि ऑस्ट्रेलिया यांनी क्वाड समूहाची स्थापना केली. यामुळेही तणावाचे वातावरण आहे. जगात असलेली शीतयुद्धासारखी परिस्थिती मोठ्या संघर्षाचे रूप धारण करू शकते. हा संघर्ष अण्वस्त्र वापरापर्यंत जाण्याचीही शक्यता असल्याने संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष हा आण्विक युद्धापर्यंत येऊन ठेपला होता. मात्र, आण्विक प्ररोधनामुळे (न्यूक्लिअर डिटरन्स) यामुळे दोघांनीही एकमेकांवर हल्ला करण्याचे टाळले. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर हा संघर्ष कमी झाला. मात्र, आज चीन आणि रशिया यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे. आज ईंटरनॅशनल कॅम्पेन टू ॲबॉलिश न्यूक्लिअर वेपन्स (आयसीएएन) ही संस्था अण्वस्त्र कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळाले नाही. पूर्वीच्या तुलनेत आज तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहे. यामुळे लष्करी तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात डागता येईल अशा शस्त्रांस्त्रांची निर्मिती झाली आहे. समुद्राखाली, समुद्र व अवकाश व जमीन आणि आकाश, अशा ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली जातील, असे तंत्रज्ञान भारतासह विकसित देशांनी विकसित केलेले आहे़ अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्राने आततायीपणा केला, तर त्याचा परिणाम सर्व मानवी समूहाला सोसावा लागणार आहे़ हिरोशिमा व नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्बचे परिणाम अजूनही तेथील नव्या पिढीला सोसावे लागत आहेत. त्यामुळे या विषयावर जागतिक समूहाने सुरक्षेच्या चौकटीत विचार करणे आज गरजेचे आहे.