लंडन : ब्रिटनच्या हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या दोन वर्षांत जागतिक तापमान सर्वात जास्त असेल. या तापमानामुळे जगाच्या हवामान व्यवस्थेत खूपच मोठे बदल घडण्याचा इशारा या विभागाने केलेल्या संशोधनात देण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरात घडत असलेल्या ‘अल निनो’च्या प्रक्रियेमुळे एकूणच जगातील वेगवेगळ्या भागातील तापमानात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तशी जागतिक तापमानात दरवर्षी निसर्गत: वाढ होत असते. मात्र यावर्षीच्या तापमानवाढीला हरितगृह वायूंचाही हातभार लागला असल्याचे दिसते. येत्या वर्षातही अशा स्वरूपाचे तापमान वाढलेले आढळण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक हवामान बदलाची प्रक्रिया घडत असल्याचे दिसते, अशी माहिती हेडली केंद्राचे संचालक स्टीफन बेल्चर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)२०१४, २०१५ व २०१६ ही वर्षे जगात सर्वाधिक तापमान नोंदविले गेलेल्या वर्षांपैकी असतील असे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत एखाद्या मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक न झाल्यास कोणताही बदल होणार नाही, असे या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले स्वतंत्र अभ्यासक प्राध्यापक रोव्हन सटन म्हणाले.
दोन वर्षांत जागतिक तापमान सर्वात जास्त
By admin | Updated: September 15, 2015 02:59 IST