शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:42 IST

दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की...

दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची पाच दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत जागतिक उद्योजकांकडून २० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी आश्वासन मिळवण्यास भारत यशस्वी झाला आहे. यांत 80 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांसह या बैठकीचे भारताच्या वतीने नेतृत्व केले. मात्र, आता या बैठीसंदर्भातील एका वृत्ताने संपूर्ण जगत खळबळ उडवून दिली आहे.

सेक्स पार्ट्यांचं काळं सत्त!डेली मेल डॉट सीओ डॉट यूके(dailymail.co.uk)मध्ये प्रसिद् झालेल्या एका वृत्तातून, दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की, या बैठकीत सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्सुअल महिलांची प्रचंड मागणी होती. सोमवारी सुरू झालेल्या या बाठकीसाठी जगभरातील 3,000 हून अधिक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते.

सेक्स 'महफिल' -टिट4टॅटचे प्रवक्ते अँड्रियास बर्गर यांनी मेलऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, "डब्ल्यूईएफच्या सुरुवातीपासूनच, आम्ही दावोस आणि जवळपासच्या प्रदेशात सुमारे 300 महिला आणि ट्रान्स महिलांना बुक होताना बघितले आहे." याची तुलना २०२४ मध्ये बुक झालेल्या अंदाजे १७० महिलांशी केली जाऊ शकते.

WEF सारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट्सची मागणी -लिया मॉडेल्स एस्कॉर्ट एजन्सीच्या जान आणि लिया यांनी म्हटले आहे की, WEF सारख्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्यपणे एस्कॉर्ट्सची मागणी वाढते. कारण जगभरातून अनेक उच्च-श्रेणीतील पाहुणे येत असतात. यामुळे WEF साठी दावोसमध्ये एस्कॉर्ट्सचे येण्याचे मुख्य कारण पैसा कमावणे होते.

9-9 कोटी रुपयांत बुक झाल्या तरुणी...? -या कार्यक्रमासाठी, जगभरातील श्रीमंत लोक येत असतात. जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा सीईओ असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग £6,000 एवढे कमावतात. अनेक एजन्सीज हे मान्य करतात की, ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या 'कंपनी'साठी एवढे पैसे सहज मोजतात. Titt4tat's बर्गरने म्हटले आहे की, WEF मध्ये सरासरी बुकिंग कालावधी चार तासांचा आहे. जो सरासरी प्रतितास दर आणि WEF च्या पहिल्या तीन दिवसांदरम्यान Titt4Tat वर 300 बुकिंगसह एकत्रितपणे सुमारे CHF300,000 (£270,000) एवढा होता.

टॅग्स :businessव्यवसाय