शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

कोविड-१९ साथीनंतरही सुरू राहणार वर्क फ्रॉम होम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 02:40 IST

बिल गेट्स यांचे प्रतिपादन : कार्यालयांवरील खर्चात होणार बचत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीने चांगले काम केले असून, कोविड-१९ महामारीनंतरही अनेक कंपन्या ही नवी कार्यपद्धती सुरूच ठेवतील, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि दानशूर अब्जाधीश बिल गेट्स यांनी केले आहे.

जगभरात कोविड-१९ महामारीने थैमान घातल्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी लागली आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे.

एका आॅनलाइन व्यवसाय शिखर परिषदेत गेट्स यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम संस्कृतीने केलेले उत्तम काम पाहणे हे चकित करणारे आहे. साथ संपल्यानंतरही ही कार्यपद्धती सुरू राहील. साथ संपल्यानंतर आपल्याला हे ठरवावे लागेल की, आपण कार्यालयात किती वेळ खर्च करायचा? बिल अ‍ॅण्ड मेलिंदा गेट्स फाउण्डेशनचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी सांगितले की, या संपूर्ण वर्षात मला खूप काही करायला वेळ मिळाला.महिलांसाठी ठरते आहे अवघड बाबगेट्स यांनी सांगितले की, सॉफ्टवेअर इंजिनिअरांनी घरून चांगले काम केले असले, तरी घरून काम करणे खरोखरच अवघड आहे. एक तर घर छोटे असते. शिवाय मुले असतात. घरातील कामही असतेच. महिलांसाठी ते आणखी अवघड असते. कारण त्यांना घरी अनेक गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ही वर्क फ्रॉम होममधील एक उणी बाजू आहे.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसcorona virusकोरोना वायरस बातम्या