शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Work From Home: शिफ्ट संपली की कर्मचाऱ्यांना फोन करू शकणार नाहीत कंपन्या; 'वर्क फ्रॉम होम'साठी या देशात नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:50 IST

Work From Home Rule's: कोरोना काळात कंपन्यांना कामाच्या नव्या पद्धतीबाबत समजले. घरून काम करण्याची पद्धत. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर आत्मसात करावे लागले.

Work From Home Rules: कोरोना काळात (Coronavirus) कंपन्यांना कामाच्या नव्या पद्धतीबाबत समजले. घरून काम करण्याची पद्धत. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर (Work From Home) आत्मसात करावे लागले. लॉकडाऊनमुळे कर्मचारी घरून काम करू लागले. काही कंपन्यांनी कोरोनाची लाट ओसरली तरी तेच कल्चर पुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही कंपन्यांनी हायब्रिड कल्चर स्वीकारले आहे. यामध्ये काही दिवस कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधून आणि काही दिवस घरून काम करता येते. 

परंतू कर्मचाऱ्यांना याचा गोष्टींचा फायदा आणि तोटाही होऊ लागला. यामुळे पोर्तुगाल देशाने नवा नियम बनविला आहे. कामाच्या वेळेनंतरही जर बॉसने कर्मचाऱ्याल फोन किंवा मेसेजद्वारे कामाबद्दल विचारणा केली किंवा सूचना दिल्या तर पोर्तुगालसारख्या देशात ते बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. फ्रान्समध्ये 2017 मध्ये असाच नियम करण्यात आला होता ज्यामध्ये कामाच्या वेळेनंतर ई-मेलला उत्तर देणे आवश्यक नव्हते.

घरून काम करण्याबाबत सर्व नियम बनवले जात आहेत आणि दिवसेंदिवस बदलत आहेत. दरम्यान, पोर्तुगालमध्ये घरून काम करण्याबाबत एक विशेष नियम  (Portugal Govt Work From Home Rules) करण्यात आला आहे, जो कर्मचाऱ्यांसाठी चांगला आहे. पोर्तुगालमध्ये घरून काम करण्याच्या नवीन नियमांची सध्या जगभरात चर्चा होत आहे.

पोर्तुगालच्या नवीन नियमांनुसार, कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याची शिफ्ट संपल्यानंतर कॉल करू शकत नाही. शिफ्ट झाल्यानंतरही कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला बोलावले तर त्याला दंड होऊ शकतो. शिफ्ट झाल्यावर स्टाफला फोन करणार्‍या बॉस किंवा वरिष्ठालाही शिक्षा होऊ शकते. सरकारला असे आढळून आले की कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना सतत कामात व्यस्त ठेवतात, यामुळे ही नियमावली बनविण्याची आवश्यकता वाटली. 

गरज का वाटलीकर्मचार्‍यांचा बॉस किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्याला कधीही फोन करायचा. याचा कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होत होता. घरी, कर्मचाऱ्याला ऑफिस कधी सुरू झालं आणि कधी संपलं हेही कळत नव्हतं आणि तो दिवसभर कामात व्यस्त राहत होता. शिफ्ट झाल्यानंतरही अशा कॉल्सचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. तथापि, कंपन्यांना कर्मचार्‍यांना अत्यंत गरज असल्यास फोन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या