शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Preet Chandi: उणे ५० डिग्री तापमानाता ४० दिवसांपर्यंत एकटी चालली ही महिला, अखेर रचला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 22:38 IST

Preet Chandi: ब्रिटनमधील शीख आर्मी ऑफिसर प्रीत चंडी या दक्षिण ध्रुवावर सोलो ट्रिप करणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत महिला बनल्या आहेत. असे करून त्यांनी इतिहास रचला आहे.

लंडन  - ब्रिटनमधील शीख आर्मी ऑफिसर प्रीत चंडी या दक्षिण ध्रुवावर सोलो ट्रिप करणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत महिला बनल्या आहेत. असे करून त्यांनी इतिहास रचला आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार प्रीत यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या ट्रिपचे आयोजन केले होते. त्यांनी अंटार्क्टिकामधील हर्क्युलस इनलेटपासून आपला प्रवास सुरू केला होता.

त्यांनी काही आठवडे अंटार्क्टिकामध्येही एकट्यानेच स्कीईंग करून घालवले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी प्रीत यांनी घोषणा केली की, त्यांनी ४० दिवसांमध्ये ११२६ किमीचा ट्रॅक पूर्ण केला आहे. प्रीत चंडी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की, मी आता खूप भावूक झाले आहे.७ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या प्रवासावर जाण्यापूर्वी ३२ वर्षीय प्रीत हिने सीएनएनवर सांगितले होते की, त्यांना अपेक्षा आहे की, त्यांचे साहसिक कार्य इतरांना प्रेरणादायी ठरेल. तसेच आपल्या सीमा पुढे विस्तारण्यासाठी आणि स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित करेल.

तर दक्षिण ध्रुवावरील प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्याय ब्लॉगवर लिहिले की, अंटार्क्टिका पृथ्वीवरील सर्वात थंड, सर्वात उंच आणि सर्वात शुष्क आणि सर्वाधिक हवा वाहणारे खंड आहे. तिथे कुणीही कायमस्वरूपी राहत नाही. तेथील तापमान उणे ५० डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली जाते. जेव्हा मी पहिल्यांदा या ट्रिपचे प्लॅनिंग केले तेव्वा मला या खंडाबाबत अधिक माहिती नव्हती. मात्र मी तिथे जाऊ इच्छित होते. तत्पूर्वी मी अडीच वर्षांमध्ये स्वत:ला तिथे जाण्यासाठी तयार केले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयEnglandइंग्लंड