शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 23:58 IST

एलन मस्क यांनी अशावेळी हे विधान केले आहे जेव्हा त्यांच्यात आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नव्या कर विधेयकावरून शा‍ब्दिक वाद रंगला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. त्यातच मस्क यांनी केलेल्या विधानामुळे अमेरिकेतली राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जर मी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केले नसते तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरले असते. त्या परिस्थितीत डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळाले असते. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये फक्त ५१-४९ मतांनी आघाडी मिळाली असती असा दावा मस्क यांनी केला आहे.

एलन मस्क यांनी अशावेळी हे विधान केले आहे जेव्हा त्यांच्यात आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नव्या कर विधेयकावरून शा‍ब्दिक वाद रंगला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर हल्लाबोल करत नव्या कर विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द करण्यात आली त्यामुळे ते नाराज आहेत असं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी कायम एलनला पसंत करतो, एलन यांनी माझ्यावर टीका करावी परंतु विधेयकावर नको. कारण हे विधेयक खूप चांगले आहे. आम्ही ईव्हीचे आदेश हटवला ज्यात इलेक्ट्रिक वाहनांना खूप पैसे मिळत होते हा मस्क यांना त्रास आहे. ईव्ही सेक्टर आधीच अडचणीत आहे आणि आता त्यांना आमच्याकडून अब्जो डॉलर अनुदान हवंय असं ट्रम्प यांनी सांगितले.

तसेच एलन आणि माझ्यात खूप चांगले संबंध होते. पुढेही ते संबंध राहतील की नाही मला माहिती नाही. मस्क यांनी व्यक्तिगत माझ्याविषयी वाईट म्हटलं नाही. परंतु मी त्याच्यावर निराश आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर या विधेयकाचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारात टेस्ला कंपनीच्या शेअरवरही दिसून आला. गुरुवारी टेस्ला कंपनीचे शेअर्स ८.४४ टक्क्यांनी घसरले. मागील २-३ दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये २८ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

"माझ्याशिवाय निवडणूक जिंकली नसती"

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मस्क यांनी खोचक विधान केले. इतिहासात कधीही असा कायदा बनला नाही जो बिग आणि ब्यूटीफूल दोन्ही असेल हे प्रत्येकाला माहिती आहे. एकतर BIG आणि UGLY विधेयक मिळेल अथवा SLIM आणि BEAUTIFUL...माझ्या विना डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते. डेमोक्रेटसचं सभागृहात वर्चस्व असते. रिपब्लिकनच्या सिनेटमध्ये ५१-४९ जागा असत्या असं सांगत मस्क यांनी ट्रम्प यांचा कृतघ्न म्हणून उल्लेख केला. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका