शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:23 IST

अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. हाऊस आॅफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले.हे निर्बंध अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुडबुड केल्याबद्दल रशियावर आणि त्याने युक्रेन व सीरियावर केलेल्या लष्करी आक्रमणाबद्दल आहेत. दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल इराणवर निर्बंध घातले आहेत. रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्यामुळे अमेरिकेच्या हितांना बाधा आली असून ते अमेरिकेच्या शेजाºयांना अस्थिर करीत आहेत, असे परराष्ट्र कामकाज समितीचे अध्यक्ष एड रॉयस म्हणाले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या कथित लुडबुडीच्या चौकशीबाबत अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांची भूमिका मला मान्य नसली तरी त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा माझा विचार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.ओबामांवर टीकायुद्धाने गंभीर अवस्थेला पोहोचलेल्या सीरियात मानवतेवर भयंकर अत्याचार होत असताना पुरेशी कृती न केल्याबद्दल ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना फटकारले. ओबामा यांनी रेषेपलीकडे जाऊन जे करायला हवे होते ते केले असते तर आज सीरियामध्ये तसेच रशिया किंवा इराण जे दिसत आहे, ते दिसले नसते, असा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.संबंध बिघडतीलरशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना मोडून टाकण्याचेअमेरिकेने लादलेले नवे निर्बंध हे ‘गंभीर पाऊल’ असल्याचे रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्जी रॅब्कोव्ह यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ला सांगितले. उभय देशांतील संबंध सामान्य बनवण्याची शक्यता नाहीशी करणारे हे निर्बंधांचे विधेयक आहे, असे ते म्हणाले.