शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानातून माघार घेणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:54 IST

सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे

वॉशिंग्टन : सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, जर त्यांनी अतिरेक्यांची मदत सुरूच ठेवली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शांतता स्थापन करण्यासाठी भारताने आणखी सहकार्य करावे, असेही आवाहन ट्रम्प यांनी केले.ट्रम्प यांनी दक्षिण आशियाबाबतचे आपले नवे धोरण सोमवारी रात्री जाहीर केले. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारत हा अमेरिकेचा प्रमुख सुरक्षा आणि आर्थिक सहकारी आहे. अफगाणिस्तानात स्थिरता आणण्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली, पण भारत अमेरिकेकडून व्यापारात अब्जावधी डॉलर कमावतो. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, भारताने आर्थिक सहकार्यात मदत वाढवावी. वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांचा द्विपक्षीय व्यापार २०१६ मध्ये वाढून ११४ अब्ज डॉलर झाला आहे. हा व्यवहार २०१४ मध्ये १०४ अब्ज डॉलर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी मागील वर्षी संयुक्तपणे हेरात प्रांतात एका ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घान केले होते. भारताची ही १७०० कोटींची योजना आहे. (वृत्तसंस्था)पाकला दिला इशारा - अनागोंदी आणि अराजकता माजविणाºया एजंटांना आश्रय देणाºया पाकिस्तानला ट्रम्प यांनी इशारा दिला. ही कृती तुम्हाला महागात पडेल. अमेरिकेकडून पाकिस्तानला अब्जावधींची मदत दिली जाते.पण पाकिस्तान अतिरेक्यांना सातत्याने आश्रय देत आहे. त्यामुळे आता आम्हीशांत बसणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्याने धोका आणखी वाढला आहे.अफगाण राजदूतांनी केले स्वागतअमेरिकेने घेतलेल्या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या वॉशिंग्टनमधील दूतावासाने स्वागत केले आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला ट्रम्प यांनी गंभीर परिणामांचा इशारा दिल्याबद्दल, राजदूत हमदुल्ला मोहिब यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.चीन पाकच्या बाजूलाबीजिंग : ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाºयानंतर, चीन लगेच पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आला. चीनने म्हटले आहे की, पाकिस्तान नेहमीच दहशतवादाविरुद्ध लढाईत पुढे असतो. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठा त्याग केला आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी योगदान दिले आहे.काबुल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानात हजारो सैनिक पाठविण्याचा मार्ग ट्रम्प यांनी मोकळा केल्याबद्दल, तालिबानने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेसाठी अफगाणिस्तान स्मशानभूमी बनून जाईल, असा इशारा देताना तालिबानने म्हटले आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैनिक न हटविल्यास, या महाशक्तीसाठी अफगाणिस्तान स्मशानभूमी झालेला असेल.युद्ध सुुरू ठेवण्याऐवजी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याबाबत अमेरिकेने विचार करायला हवा. जोपर्यंत अमेरिकेचा एकही सैनिक आमच्या भूमीवर असेल, तोपर्यंत आमचा जिहाद सुरूच राहील. ट्रम्प यांच्या धोरणानंतर काही मिनिटांतच अतिरेक्यांनी काबुलस्थित अमेरिकी दूतावासावर रॉकेट हल्ला केला. अमेरिका पूर्ण मुस्लीम समुदायाला मिटवू पाहत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे.भारताने केले स्वागतट्रम्प यांच्या धोरणाचे भारताने स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले की, शांतता, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीसाठी भारताचा अफगाणिस्तान सरकार आणि तेथील नागरिकांना पाठिंबा असेल. अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासाठी आणि विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प