शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी व्हिसा मुलाखत प्रक्रियेतून मला सूट मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 08:14 IST

US visa interview process : जरी तुम्ही मुलाखतीतून सूट मिळण्याच्या निकषात बसत असाल तरीदेखील कौन्सिलर अधिकारी तुम्हाला अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी विनंती करू शकतात.

- मनोज गडनीस

तुम्हाला जर अमेरिकेला जायचे असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळविणे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या बहुतांश अर्जदारांना व्हिसा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागते; परंतु काही अर्जदारांना मुलाखतीस उपस्थित राहण्यापासून सूट मिळते. म्हणजेच, त्यांना तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसते. (याला ड्रॉपबॉक्स असेही म्हणतात.) 

जर तुम्हाला एफ (विद्यार्थी व्हिसा), एच-१ (वर्क व्हिसा), एच-३, एच-४ नॉन ब्लँकेट, एल, एम, ओ, पी, क्यू किंवा शैक्षणिक व्हिसा, या प्रकारापैकी एखादा व्हिसा मिळालेला असेल आणि तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात किंवा निवासी आहात, तिथे अर्ज केला असेल तर तुम्ही व्हिसा मुलाखतीतून सूट मिळण्यासाठी अर्ज करू शकता. 

ज्या अर्जदाराला यापूर्वी व्हिसा नाकारला गेला असेल अशा अर्जदाराला मुलाखतीतून सूट मिळणार नाही. जरी तुम्ही मुलाखतीतून सूट मिळण्याच्या निकषात बसत असाल तरीदेखील कौन्सिलर अधिकारी तुम्हाला अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी विनंती करू शकतात.

ज्या अर्जदारांना व्हिसाचे नूतनीकरण करायचे आहे (त्यांच्याकडे सध्या जो व्हिसा आहे त्याच श्रेणीतील व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास) आणि ज्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यास ४८ महिने शिल्लक आहेत, अशा अर्जदारांनादेखील मुलाखतीतून सूट प्राप्त होऊ शकते. ज्या मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्या अर्जदारांचे वय वर्षे ८० किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचा सर्वांत अलीकडचा अमेरिकेचा व्हिसा नाकारला गेलेला नाही, ते देखील व्हिसा मुलाखतीतून सूट प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करू शकतात. (अमेरिकी कौन्सिलेटच्या सहकार्याने)

अधिक माहितीसाठी - https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/important-announcement-on-waivers-of-the-interview-requirement-for-certain-nonimmigrant-visas.html - https://in.usembassy.gov/visas/frequently-asked-questions/   - https://www.ustraveldocs.com/in/en

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा