रशियाने तयार केलेल्या कॅन्सरच्या लसीने प्रीक्लिनिकल चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. आता ही लस वापरासाठी तयार आहे. ३ वर्षांपासून केलेल्या चाचण्यांमधून त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. ही माहिती रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी दिली. 'या लसीवर अनेक वर्षांपासून संशोधन केले जात आहे आणि त्याच्या प्रीक्लिनिकल चाचण्या ३ वर्षे घेण्यात आल्या आहेत',अशी माहिती त्यांनी दिली.
'ही लस वापरासाठी तयार आहे, आम्ही अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहोत. वारंवार वापरल्यानंतरही लसीचा परिणाम खूप चांगला होता. संशोधकांना ट्यूमरच्या आकारात 60% ते 80% घट दिसून आली. लसीचे प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कर्करोग असेल. याशिवाय, ग्लिओब्लास्टोमा आणि विविध प्रकारच्या मेलेनोमासाठी लसी विकसित करण्यातही चांगली प्रगती झाली आहे, असंही वेरोनिकाने म्हणाल्या.
रशियाची लस mRNA वर आधारित
रशियाने विकसित केलेली लस ही mRNA लस आहे. प्रत्येक रुग्णाच्या RNA नुसार ती उत्तेजित केली जाईल. जर लस मंजूर झाली तर केमोथेरपीची आवश्यकता राहणार नाही. ब्रिटिश सरकार जर्मनीच्या बायोएनटेकच्या सहकार्याने कर्करोगाची लस विकसित करत आहे. अमेरिकन औषध कंपन्या मॉडर्ना आणि मर्क देखील त्वचेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी लस विकसित करत आहेत.
२०२४ मध्ये भारतात कर्करोगामुळे ८.७४ लाख मृत्यू
भारतात २०२४ मध्ये ४.६० लाख पुरुषांचा कर्करोगाने मृत्यू झाला. ४.१४ लाख महिलांनी आपला जीव गमावला. म्हणजेच पुरुषांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या महिलांपेक्षा जास्त होती. आयसीएमआरनुसार, पुढील ५ वर्षांत भारतात कर्करोगाचे रुग्ण १२% दराने वाढतील. यामध्ये तरुण लोकही वेगाने कर्करोगाला बळी पडतील. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, तरुण वयात कर्करोग होण्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली.