शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक; ब्रिटिश पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:40 IST

अमेरिकेची मोठी गुपितं फोडणाऱ्या असांजेला बेड्या

लंडन: विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला इक्वेडोरच्या दूतावासात अटक करण्यात आली. 2012 पासून ज्युलियननं असांज दूतावासात आश्रय घेतला होता. असांजेवर स्वीडनमध्ये लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणात ब्रिटनमधील न्यायालयानं त्याला 2012 मध्ये जामीन दिला. तेव्हापासून तो इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला होता.  अमेरिकेची अनेक गुपितं फोडल्यानं चर्चेत आलेल्या ज्युलियन असांजेला अटक झाली. आता त्याला स्वीडन सरकारच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. आपल्याला स्वीडनच्या ताब्यात दिल्यास अमेरिकेकडून अटक केली जाऊ शकते आणि त्यानंतर विकिलिक्सच्या माध्यमातून फोडलेल्या गुपितांबद्दल गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, अशी भीती असांजेनं व्यक्त केली. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर असांजेला अटक करण्यात आल्याची माहिती मेट्रोपॉलिटन पोलीस सर्व्हिसनं पत्रकातून दिली. कोर्टाच्या आदेशानंतर इक्वेडोरनं असांजेला दिलेलं संरक्षण काढून घेतलं. यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला दूतावासातून अटक केली. जवळपास सात वर्षे इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला असलेला ज्युलियन असांजे आता पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी माहिती गृह खात्याचे सचिव साजिद जाविद यांनी दिली. इक्वेडोरनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असं जाविद यांनी सांगितलं. त्याआधी गेल्याच आठवड्यात पत्रकार आणि असांजे समर्थक असलेल्या जॉन पिल्गर यांनी इक्वेडोरच्या दूतावासाबाहेरील रस्त्यावर जमून असांजेसाठी आवाज उठवण्याचं आवाहन केलं होतं. असांजेनं फोडलेल्या गुपितांमुळे अमेरिकेला मोठी नाचक्की सहन करावी लागली होती. असांजेमुळे अमेरिकेची अनेक लाजिरवाणं कृत्यं चव्हाट्यावर आली. मात्र अमेरिकेनं कधीही असांजेविरोधात गुन्हा नोंदवल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाही. मात्र नोव्हेंबर 2018 मध्ये या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या काही कागदपत्रांतून याबद्दलची तयारी अमेरिकेकडून सुरू असल्याचं समोर आलं होतं. ही कागदपत्रं चुकून समोर आली होती. 

टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिका