शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

३० वर्षे अमेरिकेत राहूनही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात; हरजीत कौर यांना सोडवण्यासाठी लोक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:09 IST

अमेरिकेत ७३ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेला अटक केल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Harjeet Kaur Arrest: अमेरिकेत गेल्या काही काळापासून स्थलांतरीतांच्या प्रश्नावरुन मोठा वाद सुरु आहे. अशातच एका धक्कादायक घटनेत ७३ वर्षीय भारतीय वंशाच्या हरजीत कौर यांना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु झाली आहे. ३० वर्षे अमेरिकेत राहूनही नियमित तपासणीसाठी गेल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. लोकांनी कौर यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने कोणत्याही कारणाशिवाय नियमित तपासणी दरम्यान ताब्यात घेतले होते.

हरजीत कौर गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ उत्तर कॅलिफोर्नियाच्या पूर्व उपसागरात राहत आहेत. नियमित तपासणी दरम्यान इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट  अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने शुक्रवारी शेकडो लोकांसह कौर यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत आंदोलने केली. आयसीईने यापूर्वी हरजीत कौर यांना अतिरिक्त कागदपत्रांसाठी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयात येण्यास सांगितले होते. त्यानंतर सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

माध्यमांच्या वृत्तानुसार, हरजीत कौर यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्या १९९२ मध्ये दोन मुलांची आई म्हणून भारतातून अमेरिकेत आल्या होत्या. त्यांची सून मंजी कौर म्हणाल्या की त्यांचा आश्रय अर्ज २०१२ मध्ये नाकारण्यात आला होता. तेव्हापासून त्या १३ वर्षांहून अधिक काळ दर सहा महिन्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील आयसीईकडे यासंदर्भात तक्रार करत होत्या.

आयसीईने त्यांना आश्वासन दिले होते की जोपर्यंत त्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट मिळत नाहीत तोपर्यंत त्या अमेरिकेत वर्क परमिटसह राहू शकतात. शुक्रवारी झालेल्या आंदोलनाचे आयोजन कौरचे कुटुंब, इंडिव्हिजिबल वेस्ट कॉन्ट्रा कोस्टा काउंटी आणि शीख सेंटर यांनी केले होते. या आंदोलनात अमेरिकन प्रतिनिधी जॉन गॅरामेंडी यांच्या कर्मचाऱ्यांचे सदस्य, स्थानिक निवडून आलेले अधिकारी आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते.

आंदोलकांनी 'त्या गुन्हेगार नाहीत', 'आमच्या आजीला सोडा' अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेतले होते. आंदोलकांसोबत डझनभर वाहने देखील होती, जी त्यांच्या समर्थनार्थ सतत हॉर्न वाजवत होती. 

टॅग्स :Americaअमेरिका