शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:43 IST

Greenland News: डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत.

डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. त्यासाठी अमेरिका योग्य ती कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. ग्रीनलँड खनिजांनी विपुल भूभाग आहे. त्याच्या बळावर अमेरिकेची अर्थव्यवस्था भावी काळात अधिक बळकट होऊ शकते. 

या कारणांमुळे ट्रम्प यांना हवे ग्रीनलँड१) संरक्षणदृष्ट्या अतिशय मोक्याचे आहे. २) ताब्यात असल्यास युरोपहून उत्तर अमेरिकेला कमी वेळेत पोहोचता येईल.३) अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसविण्यासाठी महत्त्वाचे.४) सध्या अमेरिकेचा ग्रीनलँडमध्ये पिटफिक हवाई तळ आहे. १९५१ साली डेन्मार्क, अमेरिकेमध्ये झालेल्या करारानुसार हा हवाई तळ उभारण्यात आला. 

ग्रीनलँडची अर्थव्यवस्था  मासेमारी व माशांची होणारी निर्यात यावर ग्रीनलँडचे ९५ टक्के अर्थव्यवहार अवलंबून. डेन्मार्ककडून काही सबसिडीही दिली जाते. डेन्मार्क ग्रीनलँडवर दरवर्षी १ अब्ज डॉलर खर्च करते. म्हणजेच तेथील रहिवाशांवर दरवर्षी प्रत्येकी १७५०० डॉलर खर्च होतात.  

ग्रीनलँडची विद्यमान स्थिती १९५३ : ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या ताब्यातील बेट आहे. तशी तरतूद १९५३ साली त्या देशाच्या राज्यघटनेत करण्यात आली. २००९ : ग्रीनलँडला स्वत:चे सरकार स्थापन करण्याची मुभा देण्यात आली, तसेच डेन्मार्कपासून स्वतंत्र होण्याचा हक्कही प्रदान करण्यात आला. 

स्वातंत्र्याची डेन्मार्कने घोषणा करण्याची मागणीग्रीनलँँड स्वतंत्र झाला असल्याची अधिकृत घोषणा डेन्मार्कने करावी अशी या बेटावर गेल्या ११ मार्च रोजी झालेल्या निवडणुकांत विजयी ठरलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाची इच्छा आहे. अन्य पक्षांनीही आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.  

हे भय आहे ग्रीनलँडच्या मनात : ग्रीनलँडमधील लोकांनाही स्वातंत्र्य हवे आहे. मात्र, तेथील श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरिबांच्या मनात एक धाकधूक आहे. नवीन वसाहतवादी आमच्यावर राज्य करून आणखी अन्याय करतील अशी भीती तेथील नागरिकांना वाटते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका