शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी पुरुषांनाच अधिक का मिळते? महिलेच्या संशोधनाला मिळाले नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 08:08 IST

गोल्डिन या अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत, असे रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सचिव हॅन्स एलेग्रेन यांनी सांगितले.

स्टॉकहोम : कामगार विश्वामध्ये महिलांची नेमकी भूमिका तसेच त्यांचा वाटा किती आहे, याबाबत सखोल संशोधन करणाऱ्या अर्थतज्ज्ञ व हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक क्लॉडिया गोल्डिन यांना यंदाच्या वर्षीचा अर्थशास्त्रासाठीचा ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

गोल्डिन या अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत, असे रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सचिव हॅन्स एलेग्रेन यांनी सांगितले. अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराकरिता विजेता निवडण्याच्या समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन म्हणाले की, कामगार विश्वामध्ये महिलांचा किती सहभाग आहे हे समजणे अतिशय आवश्यक असते. महिलांचा कामगार विश्वामध्ये सहभाग वाढविण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा अभ्यास क्लॉडिया गोल्डिन यांनी केला आहे. त्यामुळे श्रमविश्वातील पुरुष व महिलांचे प्रमाण किती व श्रमविभागणीबद्दलच्या आणखी काही गोष्टी यांच्यावर त्यांनी संशोधन केले. 

महिलांचा सहभाग कमी का? यावर केला हाेता अभ्यास- महिलांचा श्रमविश्वात सहभाग वाढविण्यामध्ये नेमके काय अडथळे आहेत, हेही गोल्डिन यांच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. - नोबेल पुरस्कार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, श्रमविश्वामध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी नेमके काय उपाय योजावेत, हे क्लॉडिया गोल्डिन आपल्या संशोधनातून सांगत नाहीत. - त्या विश्वात श्रमिक पुरुष व महिलांच्या संख्येत इतकी मोठी तफावत कशामुळे निर्माण झाली, याची मूळ कारणे गोल्डिन यांनी शोधली आहेत.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारWomenमहिलाjobनोकरी