शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या व्हिसा अॅप्लिकेशनसाठी कुणाची मदत घ्यावी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:52 IST

आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी.

ठळक मुद्देव्हिसा अॅप्लिकेशनची पूर्तता करण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावास कोणत्याही एका विशेष प्रकारची प्रवासी एजन्सी, इंटरनेट कॅफे किंवा इतर सेवांचा वापर करावा असे सूचवत नाही.अर्जदार 16 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याच्या किंवा तिच्या वतीने त्यांचे पालक किंवा पालनदार अर्ज भरू शकतील.व्हिसा प्रीपरेशन सेवेचा वापर करायचे निश्चित केले तर, तुम्हाला मदत करणारी व्यक्तीची ओळख अर्जात करून द्यावी लागेल आणि स्वाक्षरी करून तुमचा अर्ज साक्षांकित करावा लागेल.

प्रश्न - व्हिसाची पूर्तता करण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावास कोणत्या प्रवासी कंपन्या, इंटरनेट कॅफे किंवा इतर सेवांचा वापर करावा असे सुचवते ?उत्तर - व्हिसा अॅप्लिकेशनची पूर्तता करण्यासाठी अमेरिकन वाणिज्य दूतावास कोणत्याही एका विशेष प्रकारची प्रवासी एजन्सी, इंटरनेट कॅफे किंवा इतर सेवांचा वापर करावा असे सूचवत नाही. आपण स्वतःच व्हिसा अर्ज योग्यरितीने भरला आहे याची खात्री करणं सर्वात चांगला मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे जावे आणि तेथे दिलेल्या क्रमाने प्रक्रिया पूर्ण करावी. जर अर्जदार 16 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याच्या किंवा तिच्या वतीने त्यांचे पालक किंवा पालनदार अर्ज भरू शकतील.जर आपण व्हिसा प्रीपरेशन सेवेचा वापर करायचे निश्चित केले तर, तुम्हाला मदत करणारी व्यक्तीची ओळख अर्जात करून द्यावी लागेल आणि स्वाक्षरी करून तुमचा अर्ज साक्षांकित करावा लागेल. अर्ज तुम्ही स्वतः भरलात किंवा व्हिसा प्रीपरेशन सेवांचा लाभ घेतलात तरीही त्यातील सर्व माहिती पूर्ण योग्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारी आपलीच असेल. अर्जात जागा रिकाम्या राहणे व चुका यांबद्दल तुम्हीच जबाबदार असाल. उदा- जर आपण विवाहित असूनही सिंगल असो नमूद केले किंवा भारताबाहेर कोणकोणत्या देशांना आपण भेट दिली आहे हे योग्य प्रकारे नमूद केले नसल्यास तुम्ही व्हिसा प्रीपरेशन सेवांची मदत घेतली असली तरीही तुमच्या अर्जावर परिणाम होऊ शकतो.अमेरिकेचा व्हिसा मिळवून देतो अशी खात्री देणा-या संस्थांची मदत घेऊ नका. व्हिसा देण्याचा निर्णय पूर्णतः वाणिज्य दूतावास अधिकारी यांच्याकडे असतो. तसेच व्हिसा प्रीपरेशन सेवांकडे व्हिसाबाबत सकारात्मक निर्णय मिळेल असा कोणताही अधिकार नसतो.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा