शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 07:00 IST

Most Peaceful Country In The World: ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत. 

 नवी दिल्ली : आइसलँडला पुन्हा एकदा जगातील सर्वांत शांत देश होण्याचा मान मिळाला आहे. २००८ पासून आइसलँडने यात अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यानंतर डेन्मार्क आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो. शांत असल्याने सर्वात आनंदी देश म्हणून आइसलँड जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वर्चस्व कुणाचे? ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत. 

नेमके कसे ठरवले जाते? देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सामाजिक सुरक्षा आणि सैन्यीकरण यासह २३ पॅरामीटर्सवर १६३ देशांचे मूल्यमापन केल्यानंतर हा निर्देशांक जाहीर केला जातो.

भारताचे स्थान किती? जगातील सर्वांत शांत देशांमध्ये भारताचे स्थान अतिशय मागे म्हणजेच १२६वे आहे. असे असले तरीही हिंसक गुन्ह्यांमध्ये घट, राजकीय अस्थिरता कमी होण्यासह शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारल्यामुळे देशातील एकूण शांतता ३.५ टक्क्यांनी सुधारली आहे. 

शेजारी देशांची स्थिती काय? nनिर्देशांकात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये भूतानला १७वे, नेपाळला ७९वे, बांगलादेशला ८८वे आणि पाकिस्तानला १४६वे स्थान मिळाले आहे. २०२२ मध्ये हिंसाचारामुळे १७.५ ट्रिलियन डॉलरचा फटका बसला होता, nसंघर्ष अधिक आंतरराष्ट्रीय होत आहेत. २००८ मध्ये ५८ देशांना बाह्य संघर्षाचा फटका बसला होता, आता ही संख्या ९१ इतकी वाढली आहे.  जवळपास अर्ध्या जगाला संघर्षाचा फटका बसत आहे.

७९ देशांमध्ये वाढली अशांततागेल्या वर्षी जगातील ८४ देशांमध्ये सुधारणा झाली, तर ७९ देशांमध्ये शांतता कमी झाली. जागतिक शांततेची सरासरी पातळी ०.४२ टक्क्यांनी घसरली आहे. युरोप हा जगातील सर्वांत शांत प्रदेश आहे. या प्रदेशात सर्वोच्च शांतताप्रिय देशांपैकी सात देश आहेत. इतर तीन सर्वांत शांत देश आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहेत.

जगातील सर्वांत शांत देश कोणते? रँकिंग    देश १    आइसलँड २    डेन्मार्क ३    आयर्लंड ४    न्यूझीलंड ५    ऑस्ट्रिया

जगातील सर्वांत अशांत देश? रँकिंग    देश१५९    काँगो १६०    दक्षिण सुदान१६१    सीरिया१६२    येमेन१६३    अफगाणिस्तान

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय