शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुठेही लपून बसा, तुम्हाला शोधून काढूच; लादेननंतर अमेरिकेने पुन्हा घेतला 9/11 चा बदला, जवाहिरीचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:30 IST

अमेरिकी ड्रोनने अफगाणमध्ये घरात क्षेपणास्त्र घुसवून उडवल्या चिंधड्या. २०११ मध्ये लादेन मारला गेल्यानंतर जवळपास ११ वर्षांनी जवाहिरीचा खात्मा झाला.

वॉशिंग्टन : अमेरिकेने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा खात्मा झाला. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचा कट अल-जवाहिरी व ओसामा बिन लादेन या दोघांनी केला होता. लादेनला अमेरिकी सैनिकांनी  २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी अल-कायदाचा म्होरक्या बनला होता. 

इजिप्शियन शल्य चिकित्सक असलेल्या ७१ वर्षीय जवाहिरीवर २.५ कोटी डॉलरचे बक्षीस होते. सुरुवातीला लादेनच्या नेतृत्वाखाली त्याने काम केले. नंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून अल-कायदाचे नेतृत्व केले. २०११ मध्ये लादेन मारला गेल्यानंतर जवळपास ११ वर्षांनी जवाहिरीचा खात्मा झाला.  जवाहिरीला संपवण्यासाठी हल्याची परवानगी दिली होती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये सोमवारी सायंकाळी सांगितले. जवाहिरी एका इमारतीच्या बाल्कनीत उभा होता. तेव्हा ड्रोनद्वारे त्याच्यावर दोन क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. इमारतीत जवाहिरीचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, त्यांना काहीही इजा झाली नाही. (वृत्तसंस्था) 

कुठेही लपून बसा, तुम्हाला शोधून काढूच ‘९/११ च्या कारस्थानात त्याची महत्त्वाची भूमिका होती. अमेरिकेतील या हल्ल्यात २९७७ लोक ठार झाले होते. अनेक दशके तो अमेरिकन नागरिकांविरुद्ध हल्ल्याचे कट करत होता,’ असे बायडेन म्हणाले.  ‘जे आम्हाला हानी पोहोचवू इच्छितात, त्यांच्यापासून आमच्या नागरिकांचे रक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. भले तुम्ही कुठेही लपून बसा, अमेरिका तुम्हाला हुडकून काढून ठार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे बायडेन यांनी म्हटले आहे. गुप्तचर विभागाला यावर्षीच्या सुरुवातीलाच जवाहिरीचा ठावठिकाणा लागला होता. तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काबूलला गेला होता. २००१ मधील हल्ल्याचे घाव सोसलेल्या कुटुंबांना आता कुठे शांतता लाभली असेल.

टॅग्स :Osama Bin Ladenओसामा बिन लादेनAmericaअमेरिका