शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पाकिस्ताननं कुठे-कुठे ठेवलाय अण्वस्त्रांचा खजिना? सॅटेलाइट फोटोंतून झाला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 18:14 IST

अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थांनी 1999 मध्ये अंदाज वर्तवला होता की, 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 शस्त्रे असतील...

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय स्थिती भलेही बिकट राहिली असले, पण अण्वस्र बनविण्याच्या बबतीत तो कधीही मागे राहिला नाही. बुलेटिन ऑफ न्यूक्लियर सायंटिस्ट्समध्ये 11 सप्टेंबरला प्रकाशित झालेल्या, पाकिस्तान न्यूक्लियर वेपन्स 2023 नोटबुकमध्ये म्हणण्यात आले आहे की,  पाकिस्तानने हळू-हळू आपल्या अण्वस्त्रांचा विस्तार करणे सुरूच ठेवला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि हवाई दलाच्या तळांवरील कामाच्या व्यवसायिक सॅटेलाइट फोटोंच्या विश्लेषणावरून, नवे लॉन्चर आणि फॅसिलिटीज सारख्या दिसणाऱ्या सुविधा पाकिस्तानच्या अण्वस्त्रांशी संबंधित असू शकतात, असे समजते.

पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन्स 2023 नोटबुकमध्ये म्हणण्यात आले आहे की, 'आमचा अंदाज आहे की, पाकिस्तानकडे या घडीला जवळपास 170 अण्वस्त्रे असू शकतात. अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थांनी 1999 मध्ये अंदाज वर्तवला होता की, 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 शस्त्रे असतील. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत अनेक नव्या शस्त्रास्त्र प्रणाली तैनात आणि विकसित करण्यात आल्या आहेत. ज्यावरू आम्हाला अंदाज लावण्यास मदत होते. आमच्या अंदाजात बरीच अनिश्चितताही आहे. कारण पाकिस्तान अथवा इतर देशांनी पाकिस्तानी अण्विक शस्त्रागाराबद्दल अधिक माहिती प्रकाशित केलेली नाही. 

नोटबुकनुसार, पाकिस्तानचे अण्वस्त्र-सक्षम क्षेपणास्त्रांचे बेस, सुविधांसंदर्भात कुणालाही माहिती नाही. कर्मशिअल सॅटेलाइन फोटोंच्या विश्लेषणावरून समजते की, पाकिस्तानकडे किमान पाच मिसाइल बेस आहेत. जे पाकिस्तानच्या अण्वस्त्रशक्तीत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. 

अॅक्रो गॅरीसन - हे सिंध प्रांताच्या दक्षिणेकडील भागात हैदराबादपासून जवळपास 18 किलोमीटर उत्तरेला आणि भारतीय सीमेपासून जवळपास 145 किलोमीटरवर आहे. अॅक्रो गैरीसनमध्ये सहा मिसाइल टीईएल गॅरेज आहे. जे 12 लॉन्चर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे.

गुजरांवाला गॅरीसन - हे पाकिस्तानचे सर्वात मोठ्या सैन्य परिसरांपैकी एक आहे. हे पंजाब प्रांताच्या इशान्येस भारतीय सीमेपासून 60 किमी अंतरावर आहे. 

खुजदार गॅरीसन - खुजदार गॅरीसन अग्नेय बलूचिस्तान प्रांतात सुक्कुर पासून जवळपास 220 किलोमीटर पश्चिमेला आहे आणि भारतीय सीमेपासून सर्वात दूर ज्ञात मिसाइल गॅरीसन आहे. 

पानो अकील गॅरीसन - हे सिंध प्रांताच्या उत्तरेला भारतीय सीमेपासून केवळ 85 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, ते अनेक खंडांमध्ये विभागलेले आहे. ते जवळपास 20 वर्ग किलोमीटरपर्यंतच्या संयुक्त क्षेत्राला कव्हर करते.

सरगोधा गॅरीसन - हे किराना हिल्समध्ये आणि जवळपास स्थित एक मोठा परिसर आहे. जे एक सब-क्रिटिकल अणु चाचणी केंद्र आहे. याचा उपयोग पाकिस्तानने 1983 ते 1990 पर्यंत आपला अण्वस्त्र कार्यक्रम विकसित करण्यासाठी केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध