शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील पुरामुळे गहू, तांदूळ महागणार, एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापूर चीनवर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 06:35 IST

China: जोरदार पाऊस आणि पुराचा मोठा फटका यंदा चीनला बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी हंगाम तोंडावर असताना हे संकट कोसळल्याने यंदा तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे.

जोरदार पाऊस आणि पुराचा मोठा फटका यंदा चीनला बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी हंगाम तोंडावर असताना हे संकट कोसळल्याने यंदा तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चीनमधील शेती याआधीच संकटात सापडली आहे. चीनमधील जनतेची गरज भागवण्यासाठी यंदा चीनला तांदूळ आणि गहू मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागणार आहे. या स्थितीत जगभर या उत्पादनांचा तुटवडा निर्माण होऊन किमती मोठ्या प्रमाणावर भडकण्याची शक्यता आहे.

चीनची आयात वाढल्याने जगभर टंचाई रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती या आधीच भडकल्या आहेत. कमी उत्पादन झाल्याने चीनला आपल्या गरजा भागवण्यासाठी अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. यामुळे अन्नधान्याची टंचाई जगभर जाणवू शकते व त्यांच्या किमती भडकू शकतात. 

७५% उत्पादनाला फटका ७५ टक्के पिकाची कापणी पुढील दोन महिन्यात केली जाते. गहू आणि कापूस कापणीचा हंगाम तोंडावर आहे.  पुरामुळे गहू, कापूस आणि मका या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

एकीकडे  उष्णतेची लाट दक्षिण चीनला उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.  इथे आजवरच्या सर्वाधिक विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. या भागात उष्णतेच्या लाटेचा ७० वा दिवस आहे. सलग १० व्या दिवशीही उष्णतेचा रेट अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४५ अंश १ ऑगस्टपासून संपूर्ण चीनमध्ये सरासरी ४५ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. 

दुसरीकडे  पाऊस आणि पूर - चीनच्या मोठ्या भूभागाला यंदा पुराचा फटका बसला आहे.  - यांगत्से नदीच्या दोन्ही बाजूला विशेषत: सिचुआर खोऱ्याला यंदा दुष्काळाचा फटका बसला आहे. या भागात चीनचा निम्म्याहून अधिक तांदूळ पिकवला जातो. - दुष्काळामुळे यांगत्से नदीच्या प्रवाहात नेहमीपेक्षा यंदा ५० टक्के पाणी कमी आहे.  - यंदा आलेल्या पुरामुळे चीनच्या उत्तर-पश्चिमेतील पर्वतमय परिसरात आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे.  - उत्तर चीनमध्ये यापुढेही जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

टॅग्स :chinaचीन