शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ प्रवास करणाऱ्यांच्या अनुवांशिकतेवर परिणाम?

By admin | Updated: January 30, 2017 00:40 IST

अंतराळात प्रवास केल्याचा परिणाम अंतराळवीराच्या अनुवांशिकतेवर आणि जीवशास्त्रविषयक होऊ शकतो, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अभ्यासात म्हटले आहे.

वॉशिंग्टन : अंतराळात प्रवास केल्याचा परिणाम अंतराळवीराच्या अनुवांशिकतेवर आणि जीवशास्त्रविषयक होऊ शकतो, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अभ्यासात म्हटले आहे. यासाठी जुळ््या भावंडांचा अभ्यास करण्यात आला. अंतराळवीर स्कॉट केली यांचा आणि त्यांचा जुळा भाऊ मार्क याच्या गुणसूत्रांमध्ये काय काय फरक पडतो याचा शास्त्रज्ञांनी केला. स्कॉट हे जवळपास वर्षभर अंतराळात होते. स्कॉट केली यांची अंतराळ मोहीम सुरू व्हायच्या आधी, मोहिमेत आणि मोहिमेनंतर मोजमापे घेण्यात आली होती. त्यात अनुवांशिकतेवर, डीएनए मिथेलेशन आणि जीवशास्त्रविषयक चिन्हांमध्ये बदल झाल्याचे आढळले. या बदलांचे श्रेय हे त्यांनी अंतराळात जो काळ घालवला त्याला दिले जाऊ शकते. स्कॉट आणि मार्क या जुळ््या भावांच्या आतड्यांतील क्रोमोसोमसपासून ते मायक्रोबायोमेसपर्यंतच्या उंचीमध्ये आम्हाला फरक जाणवला, असे जवळपास सगळ््यांनी म्हटले, असे न्यूयॉर्कमधील विईल कॉर्नेल मेडिसीनमधील अनुवंशशास्त्रज्ञ ख्रिस्तोफर मॅसन यांनी सांगितले. जे बदल झाल्याचे दिसले ते अंतराळ प्रकाशामुळे किती आणि नैसर्गिक तफावतीमुळे किती हे शोधून काढणे हे मोठे आव्हान आहे. स्कॉट केली आणि मार्क केली हे जुळे भाऊ असून त्यांच्याबाबतीत सांगण्यात आलेले बदल हे सरसगट सगळ््यांच्याबाबतीत घडू शकतीलच, असे नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे. अभ्यासाचे हे काम खूप तपशिलाने नोंदवून ठेवण्यात आले असून ते तसे पूर्वी कधी झालेले नव्हते व या अभ्यासासाठी खूप प्रतिकूल वातावरणात काम करावे लागलेले आहे.