शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातलं तरंगतं सोनं! व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या अंबरग्रीसची किंमत पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:06 IST

व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी

अवकाशातील नवनव्या आश्चर्यांची गुपिते शोधण्यासाठी मानव जसा धडपडत असतो तसाच सागराचा तळ ढवळून काढत त्यातील गुपिते उकलण्यातही मानवप्राण्याला रस असतो. समुद्राच्या तळाशी या गुपितांबरोबरच वैविध्यपूर्ण जीवसृष्टीही सुखेनैव नांदत असते. मासा हा या जीवसृष्टीचा आद्यप्राणी. माशांमध्येही अनेक प्रकार असतात. त्यात व्हेल मासा जास्त भाव खातो. या व्हेल माशाच्या मळाला बाजारात प्रचंड मागणी असते.अंबरग्रीस हा काय प्रकार आहे?सागरात विहार करताना स्पर्म व्हेलच्या पोटात अनेक प्रकारचे मासे त्याचे भक्ष्य म्हणून विसावतात. त्यात कठीण कवच असलेल्या स्क्वीड्सचाही समावेश असतो. हे स्क्वीड्स स्पर्म व्हेलच्या पोटात गेल्यानंतर त्यांचे पचन होऊन कठीण कवचाचे तुकडे तसेच राहतात. या कवचाभोवती व्हेल माशाची पचनसंस्था एक विशिष्ट आवरण तयार करून त्यास व्हेल माशाच्या पार्श्वभागाकडे ढकलते.व्हेल माशाच्या मलविसर्जन प्रक्रियेदरम्यान हा भाग त्याच्या शरीराबाहेर पडतो. समुद्रावर तो तरंगत राहतो. सुरुवातीला या मळाला प्रचंड दुर्गंधी असते. मात्र, समुद्राच्या लाटांनी प्रक्रिया होऊन ही दुर्गंधी कमी होते. स्पर्म व्हेल नावाच्या माशाच्या पोटातून जो मळ सागरात विसर्जित होतो त्याला अंबरग्रीस असे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मूल्यवानव्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या या अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. अंबरग्रीसची दुर्गंधी कमी झाल्यावर त्यातील घटक पदार्थांतून बेचव मद्यार्क निघतात.या मद्यार्कांचा वापर स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत केला जातो. अत्तराची निर्मितीही अंबरग्रीसपासून केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो अंबरग्रीसची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जाते. अंबरग्रीसच्या मूल्यामुळे त्याची तस्करी केली जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अंबरग्रीस बेकायदेशीरपणे जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी अंबरग्रीसची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली होती.